सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये महवितरणवर मोर्चा 

महापूर ओसरून दीड महिना झाला असून, शेतातील नव्या ऊस लागणीसह विविध पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असतानाही महावितरणकडून शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत न झाला नाही.
 सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये महवितरणवर मोर्चा  For smooth power supply Morcha on Mahavitaran in Kurundwad
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये महवितरणवर मोर्चा  For smooth power supply Morcha on Mahavitaran in Kurundwad

कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून, शेतातील नव्या ऊस लागणीसह विविध पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असताना अजूनही महावितरणकडून शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने सोमवारी (ता.२१) कुरुंदवाड परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून दरवाजात ठिय्या मारला. अधिकाऱ्यांना रोखून धरत घेराव घातला व प्रश्‍नांची सरबत्ती केली.  कार्यकारी अभियंता सिकंदर मुलाणी, उपअभियंता तेजश्री साजणीकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत लवकरच ट्रान्‍स्‍फॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरू करू, असे आश्‍वासन दिल्यानंतर असता आंदोलन स्थगित केले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विश्‍वास बालिलिघाटे यांनी दिला.  जुलैमध्ये आलेल्या महापुराने वीजेचे ट्रान्‍स्‍फार्मर पाण्यात बुडाले होते. काही विजेचे खांब कोसळल्याने विद्युत तारा तुटल्याने कुरुंदवाड, हेरवाड, तेरवाड, मजरेवाडी, अकिवाट परिसरांतील शेतकऱ्यांनी बुडालेले ट्रान्‍स्‍फॉर्मर स्वखर्चाने दुरुस्तीसाठी कार्यालयापर्यंत पोहोच केले. मात्र त्यांच्या दुरुस्तीचे काम अद्यापही रखडल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली होती. ऊस लागणीचा हंगाम सुरू झाला असून, शेतातील उभ्या पिकासाठीही पाण्याची गरज असताना विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या मारला. संतप्त झालेले शेतकरी बाबासाहेब सावगावे, विश्‍वास बालिघाटे यांनी महापुरात येथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती पिकांची लावण करण्याची कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे पाण्याची गरज आहे. पाणी उपसा करण्यासाठी विजेची गरज आहे. शेतकरी कोरोना आणि महापूर या दोन्ही आपत्तीत शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा देत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.  अभियंता मुलाणी यांनी चार दिवसांत ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिल्यानंतर अधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश करू दिला. चार दिवसांत पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन तीव्र करू, असा इशारा सावगावे व बालिघाटे यांनी दिला. मोर्चात रविकिरण गायकवाड, प्रकाश खोत, बंडू उमडाळे, राजेंद्र जगदाळे, सुरेश बिंदगे, महावीर कोप्पे, साताप्पा बागडी, पांडुरंग मोहिते, मोहन मोहिते, राजेंद्र जोंग, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com