Agriculture News in Marathi For smooth power supply Morcha on Mahavitaran in Kurundwad | Page 2 ||| Agrowon

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये महवितरणवर मोर्चा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

महापूर ओसरून दीड महिना झाला असून, शेतातील नव्या ऊस लागणीसह विविध पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असतानाही महावितरणकडून शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत न झाला नाही. 

कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून, शेतातील नव्या ऊस लागणीसह विविध पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असताना अजूनही महावितरणकडून शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने सोमवारी (ता.२१) कुरुंदवाड परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून दरवाजात ठिय्या मारला. अधिकाऱ्यांना रोखून धरत घेराव घातला व प्रश्‍नांची सरबत्ती केली. 

कार्यकारी अभियंता सिकंदर मुलाणी, उपअभियंता तेजश्री साजणीकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत लवकरच ट्रान्‍स्‍फॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरू करू, असे आश्‍वासन दिल्यानंतर असता आंदोलन स्थगित केले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विश्‍वास बालिलिघाटे यांनी दिला. 

जुलैमध्ये आलेल्या महापुराने वीजेचे ट्रान्‍स्‍फार्मर पाण्यात बुडाले होते. काही विजेचे खांब कोसळल्याने विद्युत तारा तुटल्याने कुरुंदवाड, हेरवाड, तेरवाड, मजरेवाडी, अकिवाट परिसरांतील शेतकऱ्यांनी बुडालेले ट्रान्‍स्‍फॉर्मर स्वखर्चाने दुरुस्तीसाठी कार्यालयापर्यंत पोहोच केले.

मात्र त्यांच्या दुरुस्तीचे काम अद्यापही रखडल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली होती. ऊस लागणीचा हंगाम सुरू झाला असून, शेतातील उभ्या पिकासाठीही पाण्याची गरज असताना विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या मारला. संतप्त झालेले शेतकरी बाबासाहेब सावगावे, विश्‍वास बालिघाटे यांनी महापुरात येथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेती पिकांची लावण करण्याची कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे पाण्याची गरज आहे. पाणी उपसा करण्यासाठी विजेची गरज आहे. शेतकरी कोरोना आणि महापूर या दोन्ही आपत्तीत शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा देत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. 

अभियंता मुलाणी यांनी चार दिवसांत ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिल्यानंतर अधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश करू दिला. चार दिवसांत पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन तीव्र करू, असा इशारा सावगावे व बालिघाटे यांनी दिला. मोर्चात रविकिरण गायकवाड, प्रकाश खोत, बंडू उमडाळे, राजेंद्र जगदाळे, सुरेश बिंदगे, महावीर कोप्पे, साताप्पा बागडी, पांडुरंग मोहिते, मोहन मोहिते, राजेंद्र जोंग, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.


इतर बातम्या
जालन्यात ३९९५ खातेदारांचे आधार...जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १...
जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतून...जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
कोल्हापूर :महावितरणच्या थकबाकीमुक्तीत ...कोल्हापूर : कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
नाशिक : शेतकरी सोसायटीकडून सभासदांना १५...नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात...
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीत...सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...