जम्मू-काश्‍मीरमध्ये हिमवर्षाव अन् पाऊसही..

जम्मू-काश्‍मीरमध्ये हिमवर्षाव अन् पाऊसही..
जम्मू-काश्‍मीरमध्ये हिमवर्षाव अन् पाऊसही..

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील उंचावरील भागात सोमवारी हिमवर्षाव झाला, तर मैदानी भागात पाऊस पडला. काश्‍मीर खोऱ्यात थंडीची तीव्रता किंचित कमी झाली होती, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील मैदानी भागात सोमवारी (ता.२१) सकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, तर उंचावरील भागाच हिमवृष्टी झाली. मंगळवारपर्यंत (ता. २२) अनेक भागात पाऊस पडेल व दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. श्रीनगरमध्ये आज उणे ०.३ अंश सेल्सिअस तापमान होते. रविवारी (ता. २०) रात्रीही तेवढ्याच तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान कारगिलमध्ये होते. तेथे पारा उणे ६.८ अंश सेल्सिअसवर होता.

पंजाब, हरियानात थंडीचा कडाका चंडीगड ः पंजाब व हरियात किमान तापमान थोडी सुधारणा झाली असली, तरी बहुतेक भागात आजही वातावरण थंडगार होते, अशी माहिती हवामान अधिकाऱ्यांनी दिली. चंडीगडमध्ये तापमान पाच अंशाने वाढले आहे. तेथे १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, पतियाळा तसेच हरियानातील अंबाला, हिसार, कर्नाल, नारनूल रोहतक आदी ठिकाणी तापमान ९ ते १२.७ अंश सेल्सिअस दरम्यान होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com