नगर : आत्तापर्यंत ५६ लोकांची तपासणी अहवाल निगेटिव्ह 

So far 56 people have reported negative reports in Nagar District
So far 56 people have reported negative reports in Nagar District

नगर ः कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय असलेल्या ६५ रुग्णांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील ५८ लोकांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ५६ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी (ता. १८) अजून एक जण पॉझिटिव्ह आढळला. त्यानेही दुबईचा प्रवास केलेला आहे. ती व्यक्ती नगर शहराबाहेरील आहे. दरम्यान बुधवारी (ता. १७) पुन्हा १४ लोकांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. 

नगर शहरासह जिल्हाभरात कोरोना संसर्गाचा धोका पाहून प्रशासन अधिक सक्रिय झाले आहे. परदेशात प्रवास करून आलेल्या व त्या लोकांच्या अति तसेच कमी संपर्कात आलेल्या लोकांना सरकारी निगराणीनीखाली ठेवले जात आहे. नगर शहरात एक व्यक्ती कोरोना संसर्ग बाधित आढळल्यापासून तर प्रशासन अधिक दक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आला आहे. 

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय असलेल्या ६५ रुग्णांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील ५८ लोकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५६ निगेटिव्ह तर दोन पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. अहवाल निगेटिव्ह आलेल्यांपैकी बहुतांश लोकांना घरी सोडण्यात आले असून त्यांना त्यांच्या घरी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बुधवारी नमुने पाठवलेल्या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकणाऱ्या तिघांवर नगरमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

सरकारी रुग्णालयातच तपासणी आवश्यक  चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरिया, दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याची तपासणी केवळ जिल्हा रुग्णालयातच करण्यात येत आहे. परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालयात करून घ्यावी, तसेच या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना त्रास जाणवत असेल, तर त्यांनीही आरोग्य तपासणी करून घ्यावी. देखरेखीखाली असलेल्या व्यक्तींच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’ असा शिक्का मारण्यात आला आहे. या व्यक्तींना १४ दिवस कोणाच्या संपर्कात राहण्यास मनाई करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com