नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ६०१ रूग्ण कोरोनामुक्त

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मंगळवारी (ता. १९) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६०१ कोरोना बाधितांना घरी सोडण्यात आले असून त्यात ग्रामीण भागातील ६७, नाशिक मनपा क्षेत्रातील ३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातील ४६९ तर जिल्ह्याबाहेरील २८ रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
So far 601 patients have been released from corona in Nashik district
So far 601 patients have been released from corona in Nashik district

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मंगळवारी (ता. १९) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६०१ कोरोना बाधितांना घरी सोडण्यात आले असून त्यात ग्रामीण भागातील ६७, नाशिक मनपा क्षेत्रातील ३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातील ४६९ तर जिल्ह्याबाहेरील २८ रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये १११, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६४९ तर जिल्ह्याबाहेरील ३० असे एकूण ८३८ रुग्ण प्राप्त आजतागायत कोरोना बाधित आढळून आले आहेत. एकूण बाधित रुग्णांपैकी नाशिक ग्रामीण मधून ६७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ४६९ तर जिल्ह्याबाहेरील २८ असे एकूण ६०१ रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत.

सध्या नाशिक जिल्हा रुग्णालय २५, नाशिक महानगरपालिका ९, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ५२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ५६, नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी व सी.सी.सी.३३, गृह विलगीकरण १२ असे एकूण १८७ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी (ता. १९) जिल्ह्यात नव्याने नाशिक जिल्हा रुग्णालय ०५, नाशिक महानगरपालिका १२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्र ४४, तर नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. व सी.सी.सी २० असे एकूण ८१ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

तर आत्तापर्यंत नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ४० अशा एकूण ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीण भागातून ४३, नाशिक महानगरपालिका क्षेत्र १६६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्र १५५ असे एकूण ३६४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यात नव्याने घेण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांचाही समावेश आहे.

ठळक घडामोडी

  • ८३८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६०१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले
  • मालेगांव महानगरपालिका क्षेत्रामधून सर्वाधिक ४६९ रुग्णांना पूर्णपणे बरे झाले
  • सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १८७ पॉझिटिव्ह रुग्ण
  • निगेटिव्ह अहवालांची संख्या ६ हजार ६२६
  • नव्याने आढळून आले ३८ कोरोनाबाधित रुग्ण
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com