हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के पेरणी

हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार (ता. ८) पर्यंत ३ लाख २ हजार ३१८ हेक्टरवर (७१.२० टक्के) पेरणी झाली आहे.
So far 71.20% sowing has been done in Hingoli district
So far 71.20% sowing has been done in Hingoli district

हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार (ता. ८) पर्यंत ३ लाख २ हजार ३१८ हेक्टरवर (७१.२० टक्के) पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रात सोयाबीनचे क्षेत्र १ लाख ८९ हजार २५४ हेक्टर (११२.३६ टक्के), तर कपाशीचे क्षेत्र ३४ हजार ८४५ हेक्टर (४१.६२ टक्के) आहे. हळदीची २७ हजार ४१६ हेक्टरवर लागवड झाली आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी दिली.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २४ हजार ५८९ हेक्टर आहे. सोयाबीनचे सर्वसाधरण क्षेत्र १ लाख ६८ हजार ४३४ हेक्टर असताना १ लाख ८९ हजार २५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ८३ हजार ७२९ हेक्टर असताना ३४ हजार ८४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ४७ हजार ५४३ हेक्टर आहे. ४  हजार २७३ हेक्टरवर (८.९९ टक्के), मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ हजार ९७१ हेक्टर आहे, तर १ हजार २०८ हेक्टर (६१.२८ टक्के) पेरणी झाली आहे. 

तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ५९ हजार ४११ हेक्टर, तर ३४ हजार ८६ हेक्टरवर (५७.३७ टक्के) पेरणी, मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र ३३ हजार ३९९ हेक्टर, तर  ६ हजार ४५८ हेक्टर (१९.३४ टक्के) पेरणी, उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र १५ हजार ७ हेक्टर, तर ४ हजार ७७८ हेक्टरवर (३०.०७ टक्के) पेरणी झाली आहे.

तृणधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४९ हजार ५१५ हेक्टर, तर ५ हजार ४८१ हेक्टरवर (११.०७ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८ हजार ६९८ हेक्टर, तर ४५ हजार ३२२ हेक्टर (४१.७० टक्के) पेरणी झाली आहे. गळितधान्यांचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६८ हजार ४३४ हेक्टर, तर १ लाख ८९ हजार २५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com