So far from the Department of Agriculture Inputs worth Rs 7 crore confiscated
So far from the Department of Agriculture Inputs worth Rs 7 crore confiscated

  कृषी विभागाकडून आतापर्यंत  सात कोटींच्या निविष्ठा जप्त 

कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने गेल्या सात महिन्यांत राज्यभर राबविलेल्या विविध तपासणी मोहिमांमधून आतापर्यंत सात कोटी रुपये किमतीच्या निविष्ठा जप्त करण्यात आलेल्या आहेत.

पुणेः कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने गेल्या सात महिन्यांत राज्यभर राबविलेल्या विविध तपासणी मोहिमांमधून आतापर्यंत सात कोटी रुपये किमतीच्या निविष्ठा जप्त करण्यात आलेल्या आहेत.   जप्त केलेल्या निविष्ठांमध्ये ६.७३ कोटींचे बियाणे, ३४ लाखांची खते तर साडेसात लाख रुपयांच्या कीडनाशकांचा समावेश आहे. गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे व मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर यांनी अप्रमाणित बियाण्यांमधील बेकायदेशीर कामांना लक्ष्य केले आहे. त्यामुळेच सर्वांधिक जप्ती बियाण्यांमध्ये दिसून येते.  बेकायदा ठरलेल्या बियाण्यांचे वजन ६५९ टन होते. तर २७१ टन खते आणि दीड टन कीडकनाशके जप्त करण्यात आली आहेत. ‘‘जास्तीत जास्त नमुने काढणे व वेळेत त्यांचे परीक्षण अहवाल प्राप्त करून घेणे यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत. त्यामुळे वेळीच कारवाई करून बाजारात अप्रमाणित निविष्ठा जाण्यास अटकाव होतो,’’ अशी माहिती एका गुणनियंत्रण निरीक्षकाने दिली.  २०२१ ते २०२२ या वर्षात बियाण्यांचे २३,८३२, खतांचे २०,०१२ तर कीडनाशकांचे किमान ८,०९७ नमुने तपासावेत, असे आदेश कृषी आयुक्तालयाने राज्यभरातील निरीक्षकांना दिलेले आहेत. आतापर्यंत उद्दिष्ठानुसार बियाण्यांची ८१ टक्के, खतांची ५६ टक्के तर कीटकनाशकांची ८१ टक्के नमुने घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.  निविष्ठांचे नमुने घेतल्यानंतर कृषी विभागाच्या विविध प्रयोगशाळांमध्ये पाठविले जातात. आतापर्यंत बियाण्यांचे १५९९, खतांचे १३३१ तर कीडनाशकांचे १५५ नमुने अप्रमाणित निघालेले आहेत. जप्त केलेल्या बियाण्यांमध्ये यंदा कपाशीच्या एचटीबीटी बियाण्यांचे प्रमाण काही भागात जास्त होते. जूनमध्ये यवतमाळ १८ लाखापेक्षा जास्त किमती कपाशीचे बियाणे जप्त केले गेले. चंद्रपूर भागातदेखील ७० लाखाचे कपाशी बियाणे जप्त करण्यात आले.  ‘‘यवतमाळमध्येच एका कंपनीचा बेकायदेशीर प्रक्रिया केंद्र होते. तेथून चार कोटी रुपयांचे बियाणे जप्त करण्यात आले. शेतकऱ्यांची केवळ सोयाबीन, कपाशीतच नव्हे तर अन्य बियाण्यांमध्येही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. पारनेरमधून सहा लाख रुपये किमतीचे अप्रमाणित वाटाणा बियाणे जप्त केले गेले. शेतकऱ्यांना कोणत्याही बियाण्याबाबत संशय आल्यास कृषी विभागाी संपर्क करायला हवे,’’ असे एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com