Agriculture news in marathi So much for Sangli Soybean seeds available | Agrowon

सांगलीत पुरेल इतके  सोयाबीनचे बियाणे उपलब्ध 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनची पेरणीस प्रारंभ होईल. त्यामुळे कृषी विभागाने दहा हजार क्विंटल सोयाबीनचे बियाण्याची मागणी केली आहे.

सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनची पेरणीस प्रारंभ होईल. त्यामुळे कृषी विभागाने दहा हजार क्विंटल सोयाबीनचे बियाण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीनची १२२ हेक्टरवर पेरणी झाली असून, बियाणे कमी पडणार नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७७ हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ५७ हजार १६१ हेक्टर इतके आहे. गतवर्षी ४१ हजार ६५१ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. वास्तविक पाहता, जिल्ह्यातील कृष्णा-वारणेच्या नदीकाठी आणि बागायत पट्ट्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनची पेरणीस प्रारंभ होतो. त्यामुळे कृषी विभागाने सोयाबीनची ९७२५ क्विंटल बियाणाची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीची पूर्व मशागती सुरू केल्या असून, काही दिवसांत पेरणी सुरू करण्याचे नियोजन शेतकरी करू लागला आहे. 

जिल्ह्यात दर वर्षी १५ ते १६ हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागते. गेल्या वर्षी सोयाबीनचे दहा हजार क्विंटल बियाणे आले होते. तरी देखील काही प्रमाणात बियाणांचा तुटवडा भासला होता. मात्र, यंदा सोयाबीनला खुल्या बाजारात ६००० ते ६,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळू लागला असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे.

बियाणांची कमतरता भासू नये यासाठी कृषी विभागाने उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोस्ताहित केले. यामुळे जिल्ह्यात १२२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन केले असल्याने उन्हाळी सोयाबीन हे बियाणे म्हणून वापरता येईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. 

बियाणे टंचाई होण्याची शक्यता 
मे महिन्यापासून सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र, जिल्ह्याच्या इतर भागात पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणीसाठी शेतकरी पुढे येतात. त्यामुळे विलंबाने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे टंचाईला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

प्रतिक्रिया
बियाणांची कमतरता भासू नये, यासाठी शेतकऱ्यांना उन्हाळी सोयाबीन पेरणीसाठी प्रोत्साहित केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे. कृषी विभागाने सोयाबीनची उगवण क्षमता आणि बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके घेण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३०९ प्रात्यक्षिके घेतली आहे. 
सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक, सांगली 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...