दुष्काळाच्या हद्दपारीसाठी परदेशातूनही बळ

दुष्काळाच्या हद्दपारीसाठी परदेशातूनही बळ
दुष्काळाच्या हद्दपारीसाठी परदेशातूनही बळ

गोंदवले, जि. सातारा : दुष्काळ हद्दपार करण्यासाठी पेटून उठलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशातूनही आता बळ मिळू लागले आहे. स्वित्झर्लंड येथील समाजसेवक रोनाल्ड फुटिंग हे सध्या माण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करत आहेत. यानंतर जलसंधारणाच्या तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास माणमधील दुष्काळी गावांना हरित करण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता आहे. माण तालुक्‍यातून दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी सध्या गावोगावी जलसंधारणाची कामे सुरू आहेत. त्यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून लोक एकवटले आहेत. या सामाजिक ऐक्‍याची भुरळ केवळ भारतीयांनाच नव्हे तर परदेशी लोकांनाही पडली आहे. स्वित्झर्लंडमध्ये वकील असणारे रोनाल्ड फुटिंग सध्या माणमधील गावागावात या कामांची पाहणी करून मार्गदर्शन करत आहेत. रोनाल्ड फुटिंग यांनी यापूर्वी लोधवड्यातील ‘माती आडवा पाणी जिरवा’साठी मोठे योगदान दिले होते. याशिवाय लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रमांतून मदत केली होती. पाणी अडवण्याशिवाय संपूर्ण परिसर हरित करण्यावर त्यांचा अधिक भर आहे. गेल्या १२ वर्षांपूर्वी लोधवड्यात येऊन त्यांनी यासाठी यशस्वी कामगिरी केली.  यंदाही दुष्काळमुक्तीसाठी लोक एकत्र आल्याची माहिती रोनाल्ड फुटिंग यांना समजल्यावर ते भारतात आले आहेत. नुकतेच त्यांनी गोंदवले खुर्द, शिंदी बुद्रुक भागात सुरू असलेल्या जलसंधारण कामांना भेटी दिल्या. या कामामुळे ते समाधानी असले तरी केवळ पाणी अडविण्याशिवाय संपूर्ण दुष्काळमुक्तीसाठी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी, असे आवाहन रोनाल्ड फुटिंग यांनी केले आहे. लोकसहभागातून सुरू असलेल्या या कामाच्या माध्यमातून हरित गावे करण्यासाठी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास परदेशातूनही मदतीचा ओघ सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com