agriculture news in Marathi social distance in Mumbai APMC Maharashtra | Agrowon

मुंबई बाजार समितीत पोलिसांच्या मदतीने ‘सोशल डिस्टन्स’ 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारातील खरेदीदारांच्या गर्दीवर समिती प्रशासनाने पोलिसांची मदत घेत नियंत्रण मिळवले आहे.

मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारातील खरेदीदारांच्या गर्दीवर समिती प्रशासनाने पोलिसांची मदत घेत नियंत्रण मिळवले आहे. बाजार आवारात विशिष्ट अंतरानेच खरेदीदारांना प्रवेश दिला जात असून भाजीपाल्याच्या आवकेवर मर्यादा घालण्यात आली आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज २५ ते ३० हजार नागरिकांची तसेच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे करोना संसार्गाचा संभाव्य धोका लक्षात घेत संचारबंदीच्या काळात व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. मात्र यामुळे जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेत शासनाने भाजी व धान्य बाजार सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. इच्छा नसतानाही व्यापाऱ्यांनी बाजार सुरू केला होता. मात्र खरेदीदारांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याने त्यांची चिंता वाढली होती. 

विशेषत: भाजीपाला बाजारात जास्त गर्दी होत होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खारघर येथे हा बाजार तात्पुरता स्थलांतरित करण्याचे नियोजन सुरु आहे. मात्र आता एपीएमसी प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याचे चित्र आहे.

बाजारात सामाजिक अंतर ठेवून तसेच प्रवेशद्वारावर वाहनांचे निर्जंतुकीकरण करुन बाजार सुरू करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांकडून किती माल मागवला, वाहनाचा नंबर ही सर्व माहिती घेत ती पोलिसांना देण्यात येत आहे. त्यानुसार परवानगी मिळालेल्याच वाहनांना पोलिसांनी प्रवेश दिला. 

सोमवारी बाजारात दोनशे ते अडीचशे गाड्यांचीच आवक झाली होती. परंतु प्रशासनाने परवानगी दिलेल्या ६० वाहनांनाच बाजारात प्रवेश दिला. उर्वरित १८० ते २०० वाहने परस्पर मुंबईत पाठवून दिल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच केवळ दोन प्रवेशद्वारेच खुली ठेवण्यात आली होती. 

प्रत्येक वाहनांवर जंतुनाशक फवारणी करण्यात येत होती. खरेदीदाराला हात स्वच्छ धुण्यास सांगितले जात होते. सामासिक अंतर ठेवण्यासाठी लाकडी अडथळे लावण्यात आले होते. यामध्ये विशिष्ट अंतरावर एका रांगेत खरेदीदारांना सोडले जात होते. बाजारात ही शिस्त ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती. 

बाजार स्थलांतरास व्यापाऱ्यांचा विरोध 
भाजीपाला बाजारातील दोन दिवसांच्या गोंधळाने भाजीपाला व्यापार सुरक्षितेच्या दृष्टीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खारघर येथे स्थलांतराचे नियोजन कोकण विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र खारघर हे व्यापारी व खरेदीदार यांना दळणवळणासाठी लांब पडणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी व्यापारी खारघर येथे स्थलांतर होण्यास इच्छूक नाहीत. या स्थलांतराबाबत शासनाच्या बैठकीत निर्णय होईल, असे मत भाजीपाला बाजाराचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले. 
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...