सोशल मीडिया ठरला शेतकऱ्यांसाठी 'डिजिटल मार्केट'

श्रीरामपूर, जि. यवतमाळ ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशावेळी भाजीपाला बाजारपेठ प्रभावीत झाली असतानाच त्यावर सोशल मीडियाचा उतारा शेतकऱ्यांनी शोधला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत सोशल मीडिया डिजिटल मार्केटची भूमिका बजावत आहे.
Social media becomes 'digital market' for farmers
Social media becomes 'digital market' for farmers

श्रीरामपूर, जि. यवतमाळ ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशावेळी भाजीपाला बाजारपेठ प्रभावीत झाली असतानाच त्यावर सोशल मीडियाचा उतारा शेतकऱ्यांनी शोधला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत सोशल मीडिया डिजिटल मार्केटची भूमिका बजावत आहे. 

उत्पादित शेतमालाची बाजारपेठेत होणारी विक्री ‘कोरोना’मुळे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांसमोर पर्यायच उरला नव्हता. अनेक शेतकऱ्यांनी हताश भावनेतून भाजीपाला रस्त्यावर फेकला. काहींनी गुरांना चारला तर काहींनी मोफत वितरित केला, असे अनेक ठिकाणी घडले आहे.

सोशल मीडियावर तशा पोस्टही व्हायरल झाल्या. मात्र, आता हाच सोशल मीडिया शेतकऱ्यांसाठी तारणहार बनल्याची स्थिती आहे. पुसद तालुक्‍यातील वेणी खुर्द येथील शेतकऱ्यांनी याच सोशल मीडियाचा बाजारपेठेसारखा वापर करीत थेट भाजीपाला व डाळ विक्रीचा यशस्वी प्रयोग केला आहे. यापूर्वी हे शेतकरी श्रीरामपूर तसेच पुसद येथील बाजारात विकायचे. परंतु लॉकडाऊनमुळे ही परंपरागत व्यवस्था अडचणीत आली. 

परिणामी सोशल मीडियावर ऑर्डर घेत थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोचवीत नफ्याचे मार्जीन वाढविण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निलेश राठोड, तहसीलदारांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. 

घरपोच भाजीपाला आणि डाळ पोचविण्यासाठी प्रती किलो दोन रुपये अतिरिक्‍त आकारले जातात. ग्राहकांकडून सुद्धा शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याने ही रक्‍कम दिली जात आहे. या माध्यमातून गर्दी टाळण्यातही यश आले आहे.

आमचे गाव हे भाजीपाला लागवडीत आघाडीवर आहे. परंतु ‘कोरोना’नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विक्रीची अडचण निर्माण झाली होती. सोशल मीडियाद्वारे विक्री केली जात असून या अडचणीवर मात केली आहे.  — रवींद्र पुंडे, संचालक, संत खप्ती शेतकरी उत्पादक कंपनी, वेणी, पुसद, जि. यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com