तळसंदे कृषी विज्ञान केंद्रातर्फे सोशल मीडियाद्वारे मार्गदर्शन 

घुणकी, जि. कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतीपिकांचे संरक्षण आणि उत्पादन मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांना बेजार केले. शेतकऱ्यांना मदतीसाठी तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या मार्गदर्शन सुरू केले आहे.
Social media guidance by Talsande Krishi Vigyan Kendra
Social media guidance by Talsande Krishi Vigyan Kendra

घुणकी, जि. कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतीपिकांचे संरक्षण आणि उत्पादन मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांना बेजार केले. शेतकऱ्यांना मदतीसाठी तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या मार्गदर्शन सुरू केले आहे. 

लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या आहेत. शेत पिकांचे कीड-रोगांपासून संरक्षण, तसेच संवर्धन तसेच योग्य खत व्यवस्थापनाद्वारे, उत्पादनवाढीसाठी कृषी सल्ल्याची आवश्यकता असते. सध्याच्या कोरोनाच्या काळातही उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक तसेच वेबसाइटच्या साह्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या संचारबंदीच्या काळात सोशल मीडियाच्या वापरावर अधिक भर दिल्याची माहिती प्रमुख शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी दिली. त्यानुसार शेतकऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवण्याचे भान राखून शेतीची कामे करताना तोंडाला मास्कचा वापर, सॅनिटायझरचा उपयोग याविषयी सोशल मीडियातून मार्गदर्शन केले. त्यामुळे पिकाची तोडणी वर्गवारी आणि निर्यात करताना योग्य खबरदारी घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली पीक संरक्षण, उद्यान विद्या, पशुसंवर्धन, ग्रह विज्ञान, कृषी विस्तार व मृदा शास्त्र विभागाद्वारे मार्गदर्शन केले जाते. 

जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या ऊस त्याचबरोबर भाजीपाला व फळबागा या पिकांवर कधी कीटकनाशकाची फवारणी करावी व या दिवसात कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात सविस्तर माहिती व्हॉट्सअॅपद्वारे शेतकऱ्यांना दिली जाते. कृषी विज्ञान केंद्राने ४५ व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे त्याचबरोबर फेसबुक पेज, वेबसाइट द्वारे सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत देण्याची जबाबदारी कृषीतज्ज्ञ चोख बजावत आहेत. 

यावेळी खरीप पीक सोयाबीन भुईमूग या पिकांची ऑडिओ, व्हिडिओ क्लिप तयार करून व्हॉट्सअॅपद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. जगताप हे करत आहेत. हवामानाचा अंदाज आठवड्यातून दोन वेळा व्यक्त केला जातो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com