agriculture news in Marathi, societies in trouble due to mess in loan waiver scheme, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटात

अभिजित डाके
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

शासनाने कर्जमाफीचे लवकरात लवकर निकष स्पष्ट करावे. त्यामुळे कर्ज वसूल करण्यास मदत होईल. तसेच ज्या सोसायट्यांकडे कर्जमाफीची रक्कम वर्ग करावी, तरच सोसायट्या व्यस्त तफावतीतून बाहेर पडतील.
- जयवंत पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र सचिव संघटना

सांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. याचा फटका जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना बसला आहे. कर्जमाफीची रक्कम अद्यापही सोसायट्यांकडे वर्ग झालेली नाही. परिमाणी कर्जाची वसुली नसल्याने येणे पेक्षा देणे जास्त झाल्याने जिल्ह्यातील ११५ सोसायट्या व्यस्त तफावतीत गेल्या आहेत. कर्जमाफीचे निकष स्पष्ट झाल्याशिवाय तसेच कर्जमाफीची रक्कम सोसायट्यांकडे वर्ग झाल्याशिवाय सोसायट्या आर्थिक संकटातून बाहेर पडणार नाहीत. 

शासनाने एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ पर्यंतची कर्जमाफी केली. मात्र, त्यातील निकष अद्यापही स्पष्ट केले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच नाही. तर काहींनी थकलेले कर्जाची रक्कम भरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम विविध कार्यकारी सोसायट्यांवर होऊ लागला आहे. यामुळे सोसायटींचे कर्ज येणे थांबले असून, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम जास्त झाली आहे. त्यामुळे सोसायटी व्यस्त तफावतीत गेल्या आहेत. त्यात गेल्या वर्षी जिल्ह्यात पडलेला दुष्काळ. त्यामुळे शेतातून कोणतेही पिक मिळाले नाही. परिणामी दुष्काळी भागातील देखील कर्जाची रक्कम भरलेली नाही. मध्यंतरी आलेला महापुरामुळेदेखील कर्जवसुलीस अथडळे निर्माण झाले आहेत. 

शासनाने ३१ जुलै २०१७ पर्यंतची सर्व कर्जाची माहिती मागितली आहे. ती माहिती सर्व सोसायट्यांनी दिली आहे. मात्र, ही माहिती कर्जमाफीसाठीच घेतली असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. सरकारने तीन वर्षांची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे यंदाही कर्जमाफी होईल, या आशेवर शेतकरी बसला आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांनी सोसायट्यांकडून घेतलेली कर्जेदेखील भरण्यास विलंब करत आहेत. मात्र, अशात सोसायट्यांनी उभारी देण्यासाठी शासनाने कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे व्याजाचा भुर्दंड सोसायट्यांवर पडत आहे. परिणामी सोसायट्यांच्या आर्थित वर्षात मोठे नुकसान दिसून येत आहे. 

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी झालेल्या कर्जमाफी रक्कम अद्याही शासनाने वर्ग केल्या नाहीत. या रकमा वर्ग केल्यातर नक्कीच सोसायट्या व्यस्त तफावतीमधून बाहेर पडतील.

एक टक्का अनुदान गेले कुठे
आघाडी सरकारने २०१४ मध्ये सोसायटी आर्थिक सक्षम करण्यासाठी अनुदान जाहीर केले होते. यामधेय कर्जाच्या येणे बाकीवर एक टक्का किंवा एक लाखापर्यंत अनुदान देणार अशी घोषणा केली. त्यातून एतर खर्च आणि कामगार पगार अशी तरतून आहे. मात्र, हे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे हे अनुदान गेले कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
बळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णयमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या...
विदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपारनागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात...
पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या...पुणे: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत...
ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणारपुणे: पंचायत राजच्या माध्यमातून देशभरातील...
सतर्क राहून मदत कार्य कराः मुख्यमंत्रीमुंबई: मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे...
कोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासापुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून...
कोकणात पावसाचा जोर वाढणार पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी...
`कृषी’चे प्रवेश सीईटीनेच होणार पुणे: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...