agriculture news in Marathi, soft loan scheme deadline expand, Maharashtra | Agrowon

ऊस बिलासाठीच्या सॉफ्टलोन योजनेला मुदतवाढ शक्य

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 जून 2019

कोल्हापूर : शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सॉफ्ट लोन योजनेची मुदत आणखी महिनाभर वाढणार आहे. या संबंधीचे आदेश लवकरच काढण्यात येतील, असे आश्‍वासन केंद्रीय अन्न सचिव रविकांत यांनी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. 

कोल्हापूर : शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सॉफ्ट लोन योजनेची मुदत आणखी महिनाभर वाढणार आहे. या संबंधीचे आदेश लवकरच काढण्यात येतील, असे आश्‍वासन केंद्रीय अन्न सचिव रविकांत यांनी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. 

कर्ज उचलण्याची मुदत शुक्रवारपर्यंत (ता.३१) होती. मुदत कमी असल्याने कर्ज मिळण्याची प्रक्रिया रखडण्याची शक्‍यता निर्माण होत होती. परिणामी कारखान्यांना या योजनेचा फायदा होण्याची शक्‍यता धूसर होती. या पार्श्‍वभूमीवर साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी पदाधिकाऱ्यांनी केंद्रिय अन्नसचिव रवी कांत, साखर सहसचिव सुरेश कुमार, पंतप्रधान कार्यालतील साखरेचा विषय हाताळणारे सहसचिव श्रीकर परदेशी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. साखर उद्योगाबाबत पाच वर्षांचा आराखडा केंद्राला सादर करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. 

यंदेशातील ५३० कारखान्यांना दहा हजार ५४० कोटी रुपयांचे सॉफ्टलोन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी सात टक्के व्याज अनुदानदेखील मिळणार आहे. मात्र, योजनेची मुदत शुक्रवारी (ता.३१) संपली आहे. त्यामुळे अर्जासाठी एक महिन्याची तर योजनेच्या कालावधीला दोन वर्षांची मुदतवाढ मिळण्याचा आग्रह संघाने धरला होता. त्याला केंद्राने मान्यता दिली आहे.  

यंदा देशात ४३४ लाख टन साखरेची उपलब्धता असून त्यातून २६० लाख टन देशांतर्गत वापर व ३५ लाख टनाची निर्यात होईल. तरीही पुढील हंगामाच्या सुरवातीला १३९ लाख टन साखर शिल्लक राहणार असल्याने आव्हान मोठे असेल, असे संघाच्या वतिने केंद्राकडे स्पष्ट करण्यात आले. आव्हानात्मक स्थिती हाताळण्यासाठी राखीव साठा ३० लाख टनावरून ५० लाख टन करणे, ८० लाख टनापर्यंत निर्यात नेणे, किमान विक्री दरात वाढ करणे, कोटा पद्धत चालू ठेवणे असे उपाय राष्ट्रीय संघाने केंद्रासमोर ठेवले आहेत. 

दानवेंमुळे साखरउद्योगात समाधान 
राज्यातील साखर कारखान्यांना केंद्रीय अन्नमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामुळे आधार मिळण्याची चिन्हे आहेत. रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या दानवेंकडे आता देशाच्या साखर उद्योगाचे धोरण ठरविण्याचा विषय असेल. त्यांची निवड आशादायक असून कारखान्यांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती संघाकडून देण्यात आली. 

साखर तज्ज्ञांचे लवकरच चर्चासत्र 
अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीतील विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करणार आहे. या मध्ये केंद्रातील संबधित अधिकारी, देशातील साखर उद्योचे प्रतिनिधी, व विषय तज्ज्ञ यांचा सहभाग असणार आहे. यावर आधारित पाच वर्षांचा कार्य आराखडा प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे श्री वळसे पाटील यांनी या वेळी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...