agriculture news in marathi, soil health card distribution status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन आरोग्यपत्रिकांचे वाटप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी जमीन आरोग्यपत्रिका अभियान दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात ९८ हजार ४१८ मृदा नमुने तपासण्यात आले, तर दोन लाख ९८ हजार ७६४ जमीन आरोग्यपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.  

पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी जमीन आरोग्यपत्रिका अभियान दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात ९८ हजार ४१८ मृदा नमुने तपासण्यात आले, तर दोन लाख ९८ हजार ७६४ जमीन आरोग्यपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.  

शेतकऱ्यांना शेतजमिनीतील माती परीक्षणाद्वारे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेणे, त्यानुसार पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी खतमात्रांची शिफारस करण्यात येते. मागील दोन वर्षांपासून मृदा आरोग्यपत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी दरवर्षी माती नमुने घेतले जातात. गेल्या वर्षी या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

या दुसऱ्या टप्प्यात (२०१७-१८) ९१० गावांमध्ये ८६,५९२ माती नमुने तपासले असून ३ लाख ३५ हजार ९८८ जमीन आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. चालू वर्षी जमीन आरोग्य पत्रिका योजनेअंतर्गत ९२२ गावांसाठी एक लाख चार हजार ९०८ मृदा नमुने घेण्याचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. तसेच तीन लाख २२ हजार ९०८ आरोग्य पत्रिका वाटपाचा लक्ष्यांक देण्यात आला आहे.

निवडलेल्या गावातील लागवडीयोग्य असलेल्या क्षेत्रामधून बागायत क्षेत्रासाठी अडीच हेक्टर व जिरायती क्षेत्रासाठी दहा हेक्टर क्षेत्रामधून एक मृदा नमुना काढण्यात येतो. क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत मृदा नमुने काढले जातात. त्यानंतर ते विश्लेषणासाठी मृदा चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. या प्रयोगशाळेत मृदा नमुना प्राप्त झाल्यानंतर विश्लेषणासाठी मृदा नमुना तयार करण्यात येतो. हा नमुना तयार झाल्यानंतर पुढील घटकांसाठी या नमुन्याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एकूण बारा घटकांची विहित पद्धतीने तपासणी करण्यात येते. 

कृषी सहायकांनी मृदा नमुने गोळा करण्यासाठी प्रशिक्षित, माहितगार तज्ज्ञ, शेतकरी किंवा गावातील आत्माअंतर्गत नियुक्त केलेल्या कृषी मित्रांची मदत घेण्याच्या सूचना होत्या. तसेच संबंधित कृषी सहायकांनी गावातील मृदा नमुने काढण्यापूर्वी कालावधी निश्चित करून गावात दवंडी देणे, किंवा ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर सूचना लिहून गावातील शेतकऱ्यांच्या सहभाग वाढविण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...