धरणी आपुली माय, तिचे संवर्धन करा ः आमदार अभिमन्यू पवार

धरणीला शास्त्रात देखील माता म्हटले आहे ते अगदी खरे आहे. जमीन आपली आईच असल्याने आपल्याला लागणाऱ्या अन्नधान्यासह जगण्यासाठी आवश्यक अनेक गोष्टी देत असते. मात्र अलीकडे जमिनीतील अन्नद्रव्याचा अमाप उपसा होत असताना जमिनीचा पोत चांगला राहावा यासाठी काही विशेष प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे जमिनी नापीक होत चालल्या आहेत, असे प्रतिपादन औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.
Soil is our mother, nurture it: MLA Abhimanyu Pawar
Soil is our mother, nurture it: MLA Abhimanyu Pawar

औसा, जि. लातूर ः धरणीला शास्त्रात देखील माता म्हटले आहे ते अगदी खरे आहे. जमीन आपली आईच असल्याने आपल्याला लागणाऱ्या अन्नधान्यासह जगण्यासाठी आवश्यक अनेक गोष्टी देत असते. मात्र अलीकडे जमिनीतील अन्नद्रव्याचा अमाप उपसा होत असताना जमिनीचा पोत चांगला राहावा यासाठी काही विशेष प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे जमिनी नापीक होत चालल्या आहेत, असे प्रतिपादन औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.

श्री. पवार म्हणाले, की अमर्याद रासायनिक खतांचा वापर आणि धोकादायक औषधे जमिनीच्या संपर्कात आल्यामुळे जमिनीची सुपीकता धोक्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात जमिनीचे संवर्धन करण्यासाठी कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. जमिनीत जिवाणूचे प्रमाण वाढवून सेंद्रिय कर्ब वाढीसाठी शेणखत, हिरवळीची खते आणि सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित एक कार्यक्रमात आलमला (ता. औसा) येथे ते बोलत होते. या प्रसंगी लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, सरपंच कैलाश निलंगेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

या वेळी आलमला गावातील शेतकऱ्यांनी एमआरईजीएस २०२०-२१ योजनेअंतर्गत फळलागवड केलेल्या कागदी लिंबाच्या बागेला भेट देण्यात आली. आमदार श्री. पवार म्हणाले, की रोजगार हमी योजनेमधून ग्रामविकास साधता येतो. कारण या योजनेला बजेट जास्त आहे. या योजनेची व्याप्ती व्यापक करण्यात आली असून, त्याद्वारे शेतात अनेक उपक्रम हे शासनाच्या निधीच्या मदतीने राबविले जाणार आहेत. जनावरांसाठी गोठा, गांडुळनिर्मितीसाठी बेड व अन्य घटक आदी गोष्टीही या योजनेच्या माध्यमातून मिळाल्या, तर शेतकऱ्याला बाहेरून काही आणावे लागणार नाही.

तुकाराम जगताप म्हणाले, की माती संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. आतापासूनच मातीची निगा नाही राखली गेली, तर येणारी पिढी नापीक जमिनीचे मालक होतील. जमिनीचे पृथक्करण करून त्यामध्ये कमतरता आढळणाऱ्या घटकांची पूर्तता करणे गरजेचे आहे.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी एस. एन. जोशी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com