agriculture news in marathi, soil sample will be taken for testing, buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाण्यात घेतले जाणार ४८ हजारांवर माती नमुने
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 मे 2018
कृषी सहायकांच्या मदतीने माती नमुने घेण्यास सुरवात झाली अाहे. गावातील कृषी मित्रांची मदत घेऊन मेअखेरपर्यंत हे नमुने घेतले जातील. जिल्ह्यातून सुमारे ४८ हजार ९०० माती नमुने घेतल्यानंतर त्यांची तपासणी केली जाईल. त्या अाधारे जमीन अारोग्यपत्रिका तयार होतील. 
- जयंत गायकवाड, जिल्हा मृद तपासणी अधिकारी, बुलडाणा.
बुलडाणा  ः जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृद अारोग्य पत्रिका वितरण योजना राबवली जात आहे. येत्या वर्षात जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील ७४३ गावांमधील सुमारे ४८ हजार ९०० माती नमुने परीक्षणासाठी घेण्याचे नियोजन करण्यात अाले अाहे. हे नमुने कृषी सहायकांच्या मदतीने या महिना अखेरपर्यंत घेतले जाणार असून त्यानंतर प्रयोगशाळांमध्ये तपासणी होऊन त्याअाधारे अारोग्य पत्रिका वाटपाचे नियोजन ठरणार अाहे.
   
शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत जमीन अारोग्य पत्रिका वाटप कार्यक्रम २०१५-१६ पासून राबवला जात अाहे. शेतकऱ्यांना दर दोन वर्षांनी मृद अारोग्य पत्रिका उपलब्ध करून दिली जाणार अाहे. यासाठी ग्रामपातळीवर काम करणारे कृषी सहायक व त्या-त्या गावातील कृषीमित्र यांच्या मदतीने माती नमुने घेण्याचे काम केले जाते. जीपीएस तंत्रज्ञानाचाही वापर यासाठी केला जात अाहे. जिरायती क्षेत्रासाठी दहा हेक्टर क्षेत्रातून एक नमुना तर बागायती क्षेत्रासाठी अडीच हेक्टर क्षेत्रातून एक माती नमुना घेण्याची पद्धत अाहे.
 
२०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील माती नमुने परीक्षणासाठी घेण्याचे नियोजन करण्यात अाले. यात चिखली तालुक्यातील सर्वाधिक ९३ गावांतून सुमारे ५९६६ माती नमुने परीक्षणासाठी घेतले जातील. यानंतर बुलडाणा तालुक्यातील ४८ गावांमधून ५५५५ माती नमुने घेतले जातील. मेहकरमधील ८५ गावांमधून ५२९९ माती नमुने घेण्यात येतील.
 
जमीन अारोग्य पत्रिका वाटपाचा हा दुसरा टप्पा सुरू झाला. पहिल्या टप्प्यात बुलडाण्यात पाच लाख ५१ हजार ८१३ मृद अारोग्य पत्रिका वाटप करण्यात अाल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यातील अारोग्य पत्रिकांची निश्चित अाकडेवारी तपासणी अहवाल व शेतकऱ्यांची नावे अाल्यानंतर निश्चित होणार अाहेत.
 
माती नमुने घेण्यात येणाऱ्या तालुकानिहाय गावांची संख्या ः बुलडाणा ४८, चिखली ९३, मोताळा ६०, मलकापूर ३६, खामगाव ७२, शेगाव ३९, नांदुरा ५४, जळगाव जामोद ६४, संग्रामपूर ४९, मेहकर ८५, लोणार ५३, देऊळगावराजा ३२, सिंदखेड राजा ५८.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...