माती परीक्षण ही काळाची गरज : म्हस्के

बीड : ‘‘बदलत्या काळानुसार मातीचे वेळोवेळी परिक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे ,’’ असे मत मंडळ कृषी अधिकारी अश्विनी म्हस्के यांनी व्यक्त केले.
Soil testing is a need of the hour: Mhaske
Soil testing is a need of the hour: Mhaske

बीड : ‘‘बदलत्या काळानुसार मातीचे वेळोवेळी परिक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. शेतामध्ये कोण कोणते घटक आहेत, हे शेतकऱ्यांनी समजून जर रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. तर, भांडवली खर्च कमी होऊन भविष्यामध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते,’’ असे मत मंडळ कृषी अधिकारी अश्विनी म्हस्के यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानाअंतर्गत मंगळवारी (ता. १०) जातेगाव येथे मृद आरोग्य पत्रिकांविषयी मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले. म्हस्के म्हणाल्या, ‘‘माती परिक्षणामुळे जमिनीला समतोल व सकस आहार प्राप्त होऊन जमिनीची निगा योग्य प्रकारे राखली जाऊ शकते. हरितक्रांतीनंतर आपण रासायनिक खतांच्या मात्रा वारेमाप जमिनीला देत आहोत. पण, त्याचे दुष्परिणाम अलीकडच्या काळात दिसू लागला. त्यामुळे योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर मुबलक उत्पादन निर्माण करू शकतो.’’

माती आरोग्य पत्रिका अभियानाच्या अंतर्गत प्रत्यक्ष शेतात जाऊन मातीचा नमुना कसा घ्यायचा, याचेही प्रात्यक्षिक त्यांनी शेतकऱ्यांना करून दाखवले. त्याशिवाय कृषी विभागाच्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला. या प्रसंगी जातेगाव परिसरातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जातेगावचे कृषी सहायक शेळके, कृषी विभागाच्या इतर कर्मचाऱ्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com