सोलापुरात ४४ टक्के पेरण्या उरकल्या

सोलापूर : जिल्हयात यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने पेरण्यांना गती मिळाली. २९ जूनअखेर जिल्ह्यात १ लाख ३ हजार हेक्टरवर (४४ टक्के) क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. सोयाबीन, तूर, मका यांचे सर्वाधिक क्षेत्र पेरणीमध्ये आहे.
In Solapur, 44 percent sowing was completed
In Solapur, 44 percent sowing was completed

सोलापूर : जिल्हयात यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने पेरण्यांना गती मिळाली. २९ जूनअखेर जिल्ह्यात १ लाख ३ हजार हेक्टरवर (४४ टक्के) क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. सोयाबीन, तूर, मका यांचे सर्वाधिक क्षेत्र पेरणीमध्ये आहे. 

जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून खरिपाचा पेरा वाढतो आहे. पण, पावसावरच त्याचे सर्व गणित अवलंबून आहे. पूर्वी अवघे ७८ हजार हेक्टर असणारे क्षेत्र आता जवळपास दोन लाख हेक्टरच्याही पुढे आहे. यंदाही कृषी विभागाने खरिपातील वाढती पेरणी लक्षात घेऊन २ लाख ३४ हजार हेक्टर इतके उद्दिष्ट घेतले आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यात तूर, सोयाबीन, मका, मूग, मटकी, सूर्यफूल पिकांचा समावेश आहे. त्यात सोयाबीन आणि तूरीची सर्वाधिक पेरणी आहे. 

जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. शिवाय जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झाल्याने पहिल्याच महिन्यात ४४ टक्केपर्यंत पेरणी पोचली आहे. आतापर्यंत सरासरी पावसाच्या १३१ टक्के म्हणजे ११६ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, बार्शी अशा सर्वच भागात पावसाने या महिन्याची सरासरी गाठत आणली आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. येत्या आठवड्याभरात त्याला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.  तालुकानिहाय पेरणी क्षेत्र 

उत्तर सोलापूर १५०६ हेक्टर , दक्षिण सोलापूर ४२३७ हेक्टर, बार्शी ३८३१९ हेक्टर, अक्कलकोट १३३९८ हेक्टर, मोहोळ २०३३ हेक्टर, माढा ७६५२ हेक्टर, करमाळा २०३३९ हेक्टर, पंढरपूर ५३६ हेक्टर , सांगोला १२३६९ हेक्टर, माळशिरस १६०२ हेक्टर , मंगळवेढा १८६० हेक्टर ((एकूण १ लाख ३ जार ७५३ हेक्टर (४४ टक्के)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com