सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा गैरव्यवहार

सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा गैरव्यवहार
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा गैरव्यवहार

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०११ ते २०१६ या कालावधीत ३९ कोटी सहा लाख ३९ हजार १९३ हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह ३७ जणांवर विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांनी सोमवारी (ता.२१) जेलरोड पोलिसांत तक्रारी अर्ज दिला होता. पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी करून अखेरीस मंगळवारी (ता.२२) रात्री उशिरा ३७ जणांवर गुन्हा दाखल केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. बाजार समितीत १ एप्रिल २०११ ते १७ ऑक्‍टोबर २०११ या कालावधीत १४ समिती सदस्य, एक सचिव आणि १८ ऑक्‍टोबर २०११ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत २० समिती सदस्य आणि दोन सचिव यांनी गैरव्यवहार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  याबाबत माहिती अशी, की बाजार समितीच्या रकमा मुदत ठेव म्हणून ठेवताना बाजार समितीला फायदा होईल अशा प्रकारे गुंतवणूक केल्या नाहीत, बाजार समितीमधील बांधकाम मुदतीमध्ये न करणाऱ्या ठेकेदाराला दंड केला नाही, सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी बाजार समितीमध्ये शिपाई, लिपिक व अन्य कर्मचारी नियुक्त करता येत नसतानाही नियुक्ती  केली, यासह १४ मुद्‌द्‌यांचा काकडे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. प्रामुख्याने १ जानेवारी २०११ ते १७ ऑक्‍टोबर २०११ या कालावधीतील गैरव्यवहारप्रकरणी सभापती इंदुमती अलगोंडा, उपसभापती बाळासाहेब शिंदे, सदस्य महादेव चाकोते, दिलीप माने, नागराज पाटील, शंकर येनगुरे, ऊर्मिला शिंदे, अविनाश मार्तंडे, रजाक निंबाळे, धोंडिराम गायकवाड, महादेव पाटील, अप्पासाहेब उंबरजे, प्रभाकर विभुते, दगडू जाधव, सचिव डी. व्ही. कमलापुरे हे संशयित आरोपी आहेत. १८ ऑक्‍टोबर २०११ ते १७ ऑक्‍टोबर २०१६ या कालावधीतील गैरव्यवहारप्रकरणी सभापती दिलीप माने, उपसभापती राजशेखर शिवदारे, सदस्य केदार विभुते, राजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, सिद्धाराम चाकोते, सोजन पाटील, इंदुमती अलगोंडा, शांताबाई होनमुर्गीकर, उत्तरेश्‍वर भुट्टे, बाळासाहेब शेळके, अशोक देवकते, अविनाश मार्तंडे, पिरप्पा म्हेत्रे, श्रीशैल गायकवाड, चंद्रकांत खुपसंगे, नसीरअहमद खलिफा, बसवराज दुलंगे, हकीम महदम शेख, सिद्रामप्पा यारगले, सचिव डी. व्ही. कमलापुरे, प्रभारी सचिव यू. आर. दळवी हे संशयित आरोपी आहेत.  ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकारण रंगले  सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसात जाहीर होणार आहे. पण त्याचपूर्वी तत्कालीन सभापतींसह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या या प्रकारामुळे चांगलेच राजकारण रंगल्याचे चिन्ह आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील ही बाजार समिती असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. दीडवर्षापूर्वी बाजार समितीच्या संचालकमंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणूकीऐवजी बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आला आहे. आतापर्यंत दोनवेळा या प्रशासनकाला मुदतवाढ देण्यात आली. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार, या कारणामुळे ही निवडणूक पुढे ढकलली. पण एकीकडे ही प्रक्रिया सुरु असताना, दुसरीकडे बाजार समितीतील गैरव्यवहाराबाबत पडताळणीचे काम सुरु होते. तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने आणि मंत्री देशमुख हे परंपरागत विरोधक आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई सुरु झाल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. येत्या काळात ते आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.  आमचा कार्यकाळ संपून आता दीड वर्ष झाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी केलेले हे राजकीय कारस्थान आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू.   - दिलीप माने, तत्कालीन माजी सभापती, माजी आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com