Agriculture news in marathi The Solapur Bazar Samiti will continue | Agrowon

सोलापूर बाजार समिती तूर्त सुरूच राहणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 मार्च 2020

सोलापूर : 'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चालू ठेवावी की बंद करावी, या निर्णयासाठी बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन चर्चा केली. पण, सध्या तरी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेली नाही, तरीही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. समितीच्या आवारात फारवेळ गर्दी होऊ नये, याकडे लक्ष देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

सोलापूर : 'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चालू ठेवावी की बंद करावी, या निर्णयासाठी बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन चर्चा केली. पण, सध्या तरी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेली नाही, तरीही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. समितीच्या आवारात फारवेळ गर्दी होऊ नये, याकडे लक्ष देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. 

पुण्यासह अन्य जिल्ह्यांत ‘कोरोना'बाधित रुग्ण सापडल्याने सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जमाव बंदीचे आदेश काढले आहेत. शहरांतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील अध्यापन बंद केले आहे. वसतिगृहांनाही टाळे ठोकण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर बाजार समिती सुरू ठेवायची की बंद, याबाबत संचालक मंडळाची बैठक घेतली. त्यामध्ये सविस्तर चर्चा होऊन काही उपाययोजना करण्याचे ठरले. बाजार समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही त्याबाबत सुचवण्यात आले. बाजार समितीतील व्यापारी, कर्मचाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर त्यांना शेतमालाचे पैसे देऊन तत्काळ पाठवावे, बाजार समितीत गर्दी करू नये, अशा सूचना त्यांनी व्यापाऱ्यांना दिल्या. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही 

‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. जवळपास चार वेळा त्यांनी कॉल केला. मात्र, एकाही कॉलला उत्तर न मिळाल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यानंतरही पुन्हा त्यांनी स्वतःहून संपर्क केला नाही. त्यामुळे बाजार समितीच्या बंदबाबत तूर्तास निर्णय तसाच ठेवण्यात आला आहे. 

बाजार समितीच्या सूचना 

  • प्रत्येक व्यापाऱ्याने गाळ्यात सॅनिटरी लिक्‍विड, मास्क ठेवावे. 
  • बाजार समिती परिसराची दिवसातून तीनवेळा स्वच्छता करावी. 
  • जंतुनाशक औषधांचा तुटवडा भासू देऊ नका 
  • औषधांच्या पुरवठ्याकडे लक्ष द्यावे 
  • बाजार समितीत गर्दी करू नये 
  • शेतमालाच्या विक्रीनंतर शेतकऱ्यांना तत्काळ पाठवा 
  • शेतकऱ्यांना मोफत मास्क देणार 
     

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...