सोलापूर बाजार समिती चारा छावणी सुरू करणार 

सोलापूर बाजार समिती चारा छावणी सुरू करणार 
सोलापूर बाजार समिती चारा छावणी सुरू करणार 

सोलापूर : यंदाच्या दुष्काळाची तीव्रता वाढत चालल्याने सोलापूर बाजार समितीने कार्यक्षेत्रातील उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त गावे व वाड्या- वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याच्या टाक्‍या पुरविण्यासह चारा छावणी व चारा डेपोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बुधवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. याच बैठकीत समितीचा ११७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पही मंजूर करण्यात आला.

बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. २०१९-२० वर्षांतील ११७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा आजच्या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. यावर चर्चा होऊन तो मंजूर करण्यात आला. प्रामुख्याने या अर्थसंकल्पात बाजार समितीमधील अंतर्गत रस्ते, गटारी व सीसीटीव्हीच्या दुरुस्तीच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. 

माजी मंत्री (कै.) आनंदराव देवकते यांचा पुतळाही बाजार समिती आवारात उभारण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठीही जागा निश्‍चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर कांद्याच्या पीकपेऱ्याची नोंद आवश्‍यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची नोंद घेतली नाही, अशा शेतकऱ्यांनी जर कांदा उत्पादनाबाबत गावकामगार तलाठ्यांचे प्रमाणपत्र सादर केले तर ते ग्राह्य धरावे, असा ठरावही या बैठकीत झाला आहे. 

बाजार समितीच्या मागच्या बैठकीत झालेले निर्णय व इतिवृत्तांत प्रत्यक्षात आलेला मजकूर याबाबत समितीच्या तज्ज्ञ संचालकांनी आक्षेप घेतला. त्यावरून चांगलीच चर्चा झडल्याचे सांगण्यात आले. बाजार समितीच्या वतीने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह बांधण्यात आले आहे. विद्यार्थी मिळत नसल्याचे कारण सांगून या वसतिगृहाचा वापर होत नाही. वसतिगृहाच्या इमारतीचा वापर सुरू करावा, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. बाजार समितीच्या वतीने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी सुसज्ज रुग्णालय बांधण्याचीही मागणी या बैठकीत करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com