सोलापुरात सरकारविरोधात भाजपचे उपोषण

इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन, लसींचा पुरवठा होत नाही, याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे खासदार व आमदारांनी गुरुवारी (ता. १३) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
Solapur in BJP MLA agitation against government
Solapur in BJP MLA agitation against government

सोलापूर : केंद्र शासन व राज्य शासनामार्फत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन पुरवठा व कोविड लसींचा पुरवठा पुणे विभागातील जिल्ह्यांना केला जात आहे. पण सोलापूर जिल्ह्याला सापत्न वागणूक देऊन रुग्णांच्या संख्येनुसार इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन, लसींचा पुरवठा होत नाही, याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे खासदार व आमदारांनी गुरुवारी (ता. १३) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

या वेळी ‘या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वरती पाय...’ यासह राज्य सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. या वेळी खासदार जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार राजा राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, आमदार राम सातपुते, राजू सुपाते, संतोष पाटील आदींनी उपोषणात सहभाग घेतला.

यानंतर दुपारी सर्व आमदार व खासदारांनी पायी चालत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भाजप आमदार व खासदारांनी राज्य सरकारवर आरोप केले, की १२ एप्रिल २०२१ ते १० मे २०२१ या कालावधीमध्ये पुणे विभागासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन व कोविड लसपुरवठा करताना पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यावर वितरणाबाबत अन्याय होत आहे. जिल्ह्याला रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन दिली जात नाहीत. ऑक्‍सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत केला जात नाही. कोविड लसही लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही. टेस्ट किटचा पुरवठा जिल्ह्याला कमी प्रमाणात केला जातो. याउलट पुणे विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यास जास्त प्रमाणात झुकते माप देऊन सोलापूर जिल्ह्याचाही कोटा इतर जिल्ह्यांना दिला जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या वाढत असून, त्याचा परिणाम जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्युदरामध्ये झालेला आहे, असे यात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com