Agriculture news in Marathi, In Solapur, Brinjal, tomato, green chillies rate hike | Agrowon

सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची तेजीत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 जून 2019

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरचीला मागणी राहिली. त्यांच्या दरातील तेजी या सप्ताहातही पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांग्याची रोज ७० क्विंटल, टोमॅटोची ४०० क्विंटल आणि हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक राहिली. वांगी, टोमॅटोची सगळी आवक बाहेरील जिल्ह्यातूनच झाली. स्थानिक भागातील आवक तुलनेने खूपच कमी होती. पण मागणी असल्याने त्यांचे दर तेजीत राहिले. त्यातही हिरव्या मिरचीच्या दराने उच्चांक गाठला. 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरचीला मागणी राहिली. त्यांच्या दरातील तेजी या सप्ताहातही पुन्हा टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात वांग्याची रोज ७० क्विंटल, टोमॅटोची ४०० क्विंटल आणि हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक राहिली. वांगी, टोमॅटोची सगळी आवक बाहेरील जिल्ह्यातूनच झाली. स्थानिक भागातील आवक तुलनेने खूपच कमी होती. पण मागणी असल्याने त्यांचे दर तेजीत राहिले. त्यातही हिरव्या मिरचीच्या दराने उच्चांक गाठला. 

संपूर्ण सप्ताहभर दराची किरकोळ चढ-उतार वगळता हीच परिस्थिती राहिली. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्या आवक आणि दराची ही परिस्थिती आहे. 

वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, टोमॅटोला किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये, तर हिरव्या मिरचीला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये असा दर मिळाला. गवार, भेंडीचे दरही या सप्ताहात तेजीतच राहिले. गवारीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, तर भेंडीला किमान ८०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. 

मेथी, शेपू, कोथिंबिर या भाज्यांतील तेजी या सप्ताहातही कायम होती. त्यात कोथिंबिरीच्या दरात लक्षणीय वाढ राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी १००० ते १४०० रुपये, मेथीला ८०० ते ११०० रुपये आणि शेपूला १००० ते १२०० रुपये असा दर मिळाला. 

भाज्यांची आवक १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत जेमतेम होती. पण मागणीच्या तुलनेत कमी आवक राहिल्याने दर तेजीत राहिले. कांद्याच्याही परिस्थिती काहीशी अशीच राहिली. या सप्ताहातही कांद्याची आवक २० ते ४० गाड्यांपर्यंत राहिली. तर कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ७५० रुपये आणि सर्वाधिक १७०० रुपये, असा दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा २५०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...