Agriculture news in marathi In Solapur, cilantro and fenugreek prices rose again | Agrowon

सोलापुरात कोथिंबीर, मेथीचे दर पुन्हा वधारले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपू या भाजीपाल्यांना उठाव मिळाला. त्यांचे दरही पुन्हा तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपू या भाजीपाल्यांना उठाव मिळाला. त्यांचे दरही पुन्हा तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी आणि शेपूची आवक तुलनेने अगदीच कमी राहिली. या भाज्यांची आवक रोज केवळ २ ते ४ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. त्यात कोथिंबिरीची खूपच कमी आवक राहिली. त्यामुळे तिला चांगला उठाव मिळाला. कोथिंबिरीला १०० पेंढ्यांसाठी किमान १००० रुपये, सरासरी ३००० आणि सर्वाधिक ६००० रुपये, मेथीला १०० पेंढ्यांसाठी किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये आणि शेपूला किमान ८०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला. 

हिरवी मिरची, सिमला मिरची, वांग्यांच्या दरात तेजी कायम राहिली. गेल्या पंधरवड्यापासून त्यांना चांगला उठाव मिळतो आहे. त्यांची आवकही बऱ्यापैकी राहिली. त्यातही देशी वांग्यांना चांगली मागणी आहे. त्यांची आवक प्रतिदिन प्रत्येकी ३० ते ८० क्विंटलपर्यंत राहिली. 

कांद्याच्या दरात सुधारणा

कांद्याच्या आवकेत आणि दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होतो आहे. पण, या सप्ताहात त्यात चांगली सुधारणा झाली. कांद्याची आवक रोज ५० ते ७० गाड्यांपर्यंत राहिली. ही आवक सर्वाधिक बाहेरील जिल्ह्यातून झाली. त्यास प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात सिमला मिरची, वांगी, गवार तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये डाळिंब दरात सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...