Agriculture news in marathi Solapur Collector examine Karthi Vari planning in Pandharpur | Page 4 ||| Agrowon

कार्तिक वारी नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

सोलापूर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा अबाधित राखून कार्तिक वारीबाबत पूर्वतयारी म्हणून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकताच घेतला.
 

सोलापूर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा अबाधित राखून कार्तिक वारीबाबत पूर्वतयारी म्हणून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकताच घेतला.

कार्तिक यात्रा पूर्व नियोजनाबाबत जिल्हा नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, स्वप्नील रावडे, अभिजित पाटील उपस्थित होते.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वारीच्या परंपरा अबाधित राखून तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेण्यात येईल. यासाठी विविध विभागांनी वारीची पूर्वतयारी म्हणून कामांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यामध्ये नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते दुरुस्ती, साथीच्या रोगांच्या अनुषंगाने फवारणी, ६५ एकर व नदीपात्रातील वाळवंट स्वच्छता व सुविधेबाबतचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच  कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर तपासणी व उपचारासाठी आवश्यक सुविधा, बेडची उपलब्धता, ऑक्सिजन पुरवठा कोविड केअर सेंटरची उपलब्धता याबाबतचाही आढावाघेतला.


इतर ताज्या घडामोडी
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...
सोयाबीन बाजार सुधारलागेल्या आठवड्यात सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय...
मी विजबील माफीची घोषणा केलीच नव्हती :...मुंबई : आज विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (...
कागलच्या जनावरांच्या बाजाराला मिळतोय...कागल  : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार...
Big Breaking - बैलगाडा शर्यतींना...नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील बैलगाडा...
इजिप्त, इराण, तुर्कस्तान अन पाकच्या...नाशिक  : लाल कांद्याची (Red Onion) आवक...
शिर्डीत सहकार परिषद; केंद्रीय...शिर्डी : पहिला सहकारी साखर कारखाना, अशी ओळख...