सोलापुरात पीक विम्यात सुर्यफुलाचा समावेश नाही

पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये चालू खरीप हंगामामध्ये सूर्यफुल पिकाचा समावेश नाही. त्यामुळे सूर्यफुलाचे लक्षणीय क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी या विम्यापासून वंचित राहणार आहेत.
सोलापुरात पीक विम्यात सुर्यफुलाचा समावेश नाही
सोलापुरात पीक विम्यात सुर्यफुलाचा समावेश नाही

मंगळवेढा, जि. सोलापूर  ः पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये चालू खरीप हंगामामध्ये सूर्यफुल पिकाचा समावेश नाही. त्यामुळे सूर्यफुलाचे लक्षणीय क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी या विम्यापासून वंचित राहणार आहेत. जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट भागात सुर्यफुलाचे उत्पादन चांगले घेतले जाते. 

यंदाच्या खरीप हंगामातील पिक विमा योजनेच्या लाभासाठी शासनाने राज्यांमध्ये सात कंपन्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यासाठी भारती एक्‍सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांनी खरीप विमा प्रस्ताव ३१ जुलैपर्यंत दाखल करण्याच्या सूचना आहेत. या कंपनीकडे सध्या खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद , तूर , कापूस, मका व कांदा पिकांचा समावेश केला आहे. 

दरम्यान, या पिकांबरोबर सुर्यफुलाचेही पीक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, या पिकाचा या योजनेमध्ये समावेश केलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये  ६ हजार ९३६ हेक्‍टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली आहे. अजून पेरणी सुरूच आहे.

जिल्ह्यातील मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्‍यात गेल्या दोन वर्षांत मकेवर पडलेल्या लष्करी अळीचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा उत्पादनखर्च वाढला. परिणामी, शेतकरी सुर्यफुलाकडे वळले. साहजिकच, सुर्यफुलाचे क्षेत्रवाढ होत राहिली.  प्रतिक्रिया...

पीक विम्यात सुर्यफूलाचा समावेश आवश्‍यक आहे. त्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करु. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना निवेदन देऊन हा प्रश्‍न सोडवू.  - भारत भालके, आमदार 

कमी वेळेत आणि खर्चात सुर्यफूलाची पेरणी होते. पण, हवामान बदलाने होणाऱ्या नुकसानीसाठी विमा सुरक्षा पाहिजेच. पण, आता विम्यात समावेश नसल्याने अडचण झाली आहे. शासनाने याचा विचार करावा. - नामदेव चौगुले, शेतकरी, मुंढेवाढी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com