सोलापुरात काकडी, गाजराला उठाव; दर टिकून

सोलापुरात काकडी, गाजराला उठाव; दर टिकून
सोलापुरात काकडी, गाजराला उठाव; दर टिकून

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात बुधवारी (ता. १) काकडी, गाजराची आवक जेमतेम राहिली; पण त्यांना चांगला उठाव राहिल्याने त्यांचे दर काहीसे टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात बुधवारी काकडीची ३० क्विंटल आणि गाजराची चार क्विंटलपर्यंत आवक झाली. गत पंधरवड्यापासून गाजर आणि काकडीला चांगला उठाव मिळतो आहे. त्यांची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच झाली. काकडीला प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये आणि गाजराला किमान ५०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची यांच्या दरात चढ-उतार राहिला. वांग्याची फक्त ५० क्विंटलपर्यंत आवक राहिली.

ढोबळी मिरचीची १०० क्विंटल आणि टोमॅटोची प्रत्येकी ३०० क्विंटलपर्यंत आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये, सरासरी १७०० रुपये, सर्वाधिक ३००० रुपये, टोमॅटोला किमान ३०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये आणि ढोबळी मिरचीला किमान २००० रुपये, सरासरी २५०० आणि ३००० रुपये दर मिळाला. भाजीपाल्याची आवक पुन्हा कमीच झाली. पण भाजीपाल्याला काहीसा कमीच उठाव होता. त्यामुळे दरही जैसे थे होते. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ३०० ते ५०० रुपये, मेथीला ३५० ते ५५० रुपये आणि शेपूला २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या दरातही फारशी सुधारणा झाली नाही. पण कांद्याला स्थानिक भागापेक्षा बाहेरून जास्त मागणी राहिली. कांद्याची आवक खूपच कमी ५ ते १० गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com