सोलापूर जिल्ह्यासाठी खरीप विम्याचे ३४ कोटी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील ४१ हजार ४२ शेतकऱ्यांना ३४ कोटी ७७ लाख रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी खरीप विम्याचे ३४ कोटी
सोलापूर जिल्ह्यासाठी खरीप विम्याचे ३४ कोटी

सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत गतवर्षी खरीप हंगामात २ लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी १ कोटी ८९ लाख ८१५ हेक्टर क्षेत्रासाठी १० कोटी ३४ लाख रुपये हिस्सा जमा केला होता, त्यापोटी जिल्ह्यातील ४१ हजार ४२ शेतकऱ्यांना ३४ कोटी ७७ लाख रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे. 

दर वर्षी खरिपात जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा उतरवतात, जिल्ह्याचा हंगाम मूळ तसा रब्बीचा असला, तरी खरिपातही बऱ्यापैकी पिके घेतली जातात. गेल्या काही वर्षांपासून पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढते आहे.

आता पहिल्या टप्प्यात जमा झालेल्या पीक विम्यात अक्कलकोट तालुक्यातील ४७१२ शेतकऱ्यांना २.४३ कोटी, बार्शी ४१०४ शेतकऱ्यांना २८ कोटी, करमाळा २५७ शेतकऱ्यांना १३ लाख, माढा तालुक्यातील १८२ शेतकऱ्यांना १८ लाख, माळशिरस तालुक्यातील ९७ शेतकऱ्यांना ४० लाख, मंगळवेढा तालुक्यातील १९४१ शेतकऱ्यांना १ लाख, मोहोळ तालुक्यातील ६३७ शेतकऱ्यांना १ कोटी, पंढरपूर तालुक्यातील १२ शेतकऱ्यांना १० लाख, सांगोला तालुक्यातील ३९ शेतकऱ्यांना २० लाख, उत्तर सोलापूर तालुक्यातील १४५२ शेतकऱ्यांना १ कोटी २५ लाख, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८९७ शेतकऱ्यांना १ कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे. या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ८ हजार १९९ शेतकऱ्यांपैकी ६४८९ शेतकऱ्यांचा विमा मंजूर करण्यात आला आहे, यापोटी ४ कोटी ४६ लाख रुपयांचा विमा रक्कम मिळणार आहे, असे सांगण्यात आले.

सहा हजार अर्ज अपात्र खरीप पीक विम्याच्या या नुकसान भरपाईत पात्र शेतकऱ्यांना विमा रकमेचे वाटपही सुरू झाले आहे. आता ४१ हजार शेतकऱ्यांना हा विमा मंजूर झाला. पण काही तांत्रिक कारणे आणि पुरेशा कागदपत्रांअभावी ६ हजार ६१० अर्ज या विम्याच्या लाभासाठी अपात्र ठरली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com