Agriculture news in marathi, In Solapur district, 85 percent work of inspections has been completed | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात पंचनाम्याचे ८५ टक्के काम पूर्ण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मॉन्सूनोत्तर पावसामुळे पांगरी परिसरातील सोयाबीन, कांदा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कांद्याची पेरणी झाली होती. त्यांचे नुकसान झाल्याचे पाहणीत आढळून येत आहे.  त्यांच्या पंचनाम्यांचे काम वेगाने सुरू आहे.
- श्रीकांत शेळके, तलाठी, पांगरी, ता. बार्शी. 

सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जवळपास एक लाख २५ हजार ७३९ शेतकऱ्यांना बसला  आहे. ९९ हजार ३६ हेक्‍टरचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १०३४ गावे बाधित झाली असून, बाधित क्षेत्रापैकी ८५.६ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत’’, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्‍यात पावसाने नुकसान केले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून प्रशासनाकडून महसूल व कृषी अशा संयुक्त पथकाद्वारे पंचनाम्याचे काम सुरू आहे. नुकसानग्रस्त ९९ हजार ३६ पैकी हेक्‍टरपैकी ८४ हजार ७२८ हेक्‍टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. १४ हजार ३०८ हेक्‍टरच्या पंचनाम्याचे काम अद्याप होणे बाकी आहे. पंचनाम्याचे उर्वरित कामही तातडीने पूर्ण करण्याची सूचना दिल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. 

जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान बार्शी तालुक्‍यात झाले आहे. तालुक्‍यातील ३२ हजार २३५ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यातील पाच हजार ७२५, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील १७ हजार ४०२, अक्कलकोट तालुक्‍यातील नऊ हजार ५२१, माढा तालुक्‍यातील सहा हजार ४६५, करमाळा तालुक्‍यातील तीन हजार ३४२, पंढरपूर तालुक्‍यातील चार हजार ८३३, मोहोळ तालुक्‍यातील १६ हजार, मंगळवेढा तालुक्‍यातील १४८, सांगोला तालुक्‍यातील २५९ व माळशिरस तालुक्‍यातील तीन हजार१०५ हेक्‍टरचे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले आहे, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

रब्बीच्या पेरण्या रखडल्या

दरम्यान, आजही रब्बीच्या पेरण्या पावसामुळे वाफसा नसल्याने रखडल्या आहेत. शिवाय आता पंचनाम्यानंतर तातडीने ही मदत मिळेल का आणि ही मदत किती मिळेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतात अजूनही पाणी असल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामेही झालेली नाहीत. त्यामुळे रब्बी हंगाम यंदा भलताच लांबणार असल्याची स्थिती आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन...नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीमुळे २५...
राज्यातील लॉकडाउनबाबत उद्या बैठकमुंबई : केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाउनचे...
नायगावात कोट्यवधीचा कापूस आगीमुळे खाक नांदेड : जिल्ह्यातील नायगाव येथील भारतीय कापूस...
शेतकऱ्यांनी न खचता सज्ज राहावे ः...परभणी : ‘‘मराठवाड्यातील शेती पुढे अनेक समस्‍या...
बीड विभागात कापसाची १६ लाख ११ हजार...बीड : कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची साथ...
जळगावात पीक कर्जवाटपाबाबत नुसत्याच...जळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
मराठवाड्यात ३२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा...औरंगाबाद : मराठवाड्यातील २५१ गाव व ९८ वाड्यांतील...
आधुनिक लागवड तंत्रज्ञान स्विकारा ः डॉ....अर्धापूर, जि.नांदेड : ‘‘सोयाबीन हे एक महत्त्वाचे...
खानदेशात धान्य लिलाव बंदच जळगाव : खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये धान्य...
सोलापूर जिल्हा परिषदेच्या चार...सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा...
सोलापुरात बाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष...सोलापूर ः जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती...
‘ॲग्रो ॲम्ब्युलन्स’द्वारे पिकांवरील...नाशिक : मुक्त विद्यापीठातील कृषि विज्ञान...
सांगलीत शेतकरी अपघात विम्याचे २७३...सांगली ः शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू, अवयव निकामी...
नाशिक जिल्ह्यात पूर्वहंगामी टोमॅटो...नाशिक  : मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीत...
सोलापुरात पीककर्जाबाबत बँकांचे धिम्या...सोलापूर ः खते-बियाणे पुरेशाप्रमाणात उपलब्ध करुन...
नगरला सायंकाळीही भाजीपाला, फळांचे लिलावनगर : मुंबई, पुण्यातील बाजारात भाजीपाला, फळांची...
अकोला जिल्ह्यात पूर्वमोसमी कपाशी लागवड...अकोला ः जिल्ह्यात दरवर्षी होणारी पूर्वमोसमी...
अकोल्यात ज्वारी, मका खरेदीसाठी नोंदणी...अकोला ः भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी,...
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईत वाढसातारा ः जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांसह इतर...
वीज ग्राहकांचे प्रश्‍न प्राधान्याने...कोल्हापूर : सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांच्या...