agriculture news in marathi, Solapur District Bank Applying the loan 'OTS' scheme | Agrowon

सोलापूर जिल्हा बॅंकेच्या थकीत कर्जाला ‘ओटीएस' योजना लागू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 जानेवारी 2019

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी 'एकरकमी कर्ज परतफेड योजना' (ओटीएस) लागू करण्याचा निर्णय गुरुवारी (ता.३) बॅंकेच्या सभेत घेण्यात आला.

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची थकीत कर्जे वसूल करण्यासाठी 'एकरकमी कर्ज परतफेड योजना' (ओटीएस) लागू करण्याचा निर्णय गुरुवारी (ता.३) बॅंकेच्या सभेत घेण्यात आला.

जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या आणि मार्च २०१८ पर्यंत थकलेल्या कर्जांना या योजनेत सामावून घेण्याचा निर्णयही यावेळी ठरला. जिल्हा बॅंकेची थकबाकी वरचेवर वाढतेच आहे. त्यामुळे 'नाबार्ड'च्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'ओटीएस' योजना राबवावी, अशी सभासदांची मागणी होती. यापूर्वीच्या बॅंकेच्या संचालकांनी 'ओटीएस' योजना राबवण्याचा ठरावही केला होता. पण, त्याची अंमलबजावणी केली नाही. पण आता शेवटी हा निर्णय घ्यावाच लागला.

बिगरशेती कर्जाच्या थकबाकीदारांसाठी मार्च २०१६ पर्यंत 'ओटीएस' योजना देण्याची मुदत होती. पण, कर्जमाफीच्या चर्चेने त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, राज्य शासनाने दीड लाखाच्या मर्यादेतच कर्जमाफी दिली. उर्वरित रकमेला 'ओटीएस' योजना दिली. नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले. त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अशा स्थितीत सर्व थकीत कर्जांना ओटीएसची मुदत वाढवण्याची मागणी झाली. सहकार खात्याच्या पुणे विभागीय सहनिबंधकांनी विशेष सभा बोलावून त्याला मंजुरी घेण्याची सूचना केली. त्यानुसार गुरुवारी बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. मार्च २०१८ पर्यंत थकित कर्जांना लागू आहे.जिल्हा बॅंकेचे सरव्यवस्थापक के. व्ही. मोटे, व्यवस्थापक के. आर. पाटील यावेळी उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत...अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत...
फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त...नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील...
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही...यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या...
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला...नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी...
परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१...परभणी : जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने...
हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदीनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान...
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची...बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत...
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या...बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि...
पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला...पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या...
पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी...पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा...
पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी...पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त...
नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी...नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरीप...सातारा  ः पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील...
रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`...कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत...
वऱ्हाडात टेक्स्टटाइल, अन्न प्रक्रिया...अकोला  ः विदर्भातील वऱ्हाड हा भाग...
पावसाळी वातावरणात डाऊनी नियंत्रणासाठी...सर्वच द्राक्ष विभागामध्ये गुरुवार ते सोमवार (ता....
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...