सोलापूर जिल्हा बॅंकेच्या ठेवीत ७५० कोटींची वाढ

सोलापूर जिल्हा बॅंकेच्या ठेवीत ७५० कोटींची वाढ
सोलापूर जिल्हा बॅंकेच्या ठेवीत ७५० कोटींची वाढ

सोलापूर : दुष्काळामुळे शेती कर्जाची थकबाकी वाढली असतानाच कर्जमाफीतून मिळालेल्या पैशातून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची वाटचाल आश्‍वासक पद्धतीने सुरू आहे. घटलेल्या ठेवी, बड्या थकबाकीदारांकडील दोन हजार कोटींच्या थकबाकीतून आता बॅंकेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मार्ग काढत मार्च २०१९ पर्यंत ३८२ कोटी तर सद्य:स्थितीत ७५० कोटींच्या ठेवी वाढवल्या आहेत. त्यामुळे डबघाईला निघालेली सोलापूर जिल्हा बॅंक आता सावरत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा बॅंकेवर काम करणाऱ्या राजकीय नेत्यांनीच बॅंकेवर कर्जाचा मोठा डोंगर वाढवून ठेवल्याने आणि व्यवहारातील अनियमिततेमुळे बॅंकेवर सध्या प्रशासक आहे. त्यामुळे बॅंकेची आर्थिक स्थिती बिघडली होती. पण, प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी मोठ्या प्रयत्नातून ही घडी पुन्हा बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बड्या थकबाकीदारांकडील थकबाकी वसुली अद्याप झालेली नाहीत. 

तसेच बहुतांश प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. मात्र, आर्यन शुगरचा ताबा मिळविण्यात बॅंकेला यश मिळाले. आता सर्वाधिक थकबाकी असलेल्या विजय शुगरचा ताबा मिळविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल बॅंकेने उचलली आहेत. त्यातूनच ठेवी वाढविण्याबरोबर गेल्या वर्षभरात ग्रामीण भागातील ७५ प्रकारच्या २४ हजार लघू व्यावसायिकांना प्रत्येकी २५ हजारांचे कर्जवाटप केले असून शिक्षकांनाही १८० कोटींचे कर्ज वितरित केले आहे. 

शेतीकर्जासाठी मात्र एकूण मागणी आणि उपलब्ध निधी, याचा विचार करता आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे दिसते. बॅंकेच्या जवळपास २०८ शाखा आहेत. सध्या बॅंकेकडे २ हजार ६५० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती आणखी सुधारेल, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे बॅंकेच्या एकूण व्यवस्थापनावरून दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com