Agriculture news in marathi Solapur District Bank Loans free to 43,000 farmers | Agrowon

सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

जिल्हा बॅंकेचे काम जवळपास होत आले आहे. जिल्ह्यातील साधारणतः दोन हजार शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नाहीत. अथवा, त्यांचे आधार कार्ड बॅंकेकडे उपलब्ध नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत बॅंकेत आधार कार्ड जमा केले नाही. त्यांनी आधार कार्डची माहिती बॅंकेला (ज्या शाखेतून कर्ज घेतले आहे त्या शाखेला) द्यावी. या योजनेत आधार कार्ड महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. 
- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, (सहकारी संस्था), सोलापूर.

सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी लाभ द्यावयाच्या शेतकऱ्यांच्या यादीचे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हा बॅंकेकडील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तपासून तयार झाली आहे. सुमारे ४३ हजार ४०६ शेतकऱ्यांची माहिती लेखापरीक्षकांच्या माध्यमातून पडताळण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून पोर्टलवर अपलोडिंगचे काम सुरू होणार आहे. 

जिल्ह्यात असलेल्या एक हजार २७९ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांपैकी ११८० संस्थांतील शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांची माहिती पडताळण्यासाठी जिल्ह्यात ५५ लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांची माहिती त्यांच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने सरकारला पाठविण्यात येणार आहे.

जिल्हा बॅंकेची माहिती मात्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून सरकारला पाठविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि सहकार निबंधक कार्यालयाने योजना जाहीर झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा आणि बैठका घेत गतीने काम केले.

राज्यात सोलापूर आघाडीवर

आता कर्जमुक्‍तीच्या लाभार्थ्यांची नावे आणि त्यांच्या रकमा याची सर्व माहिती सध्या तयार झाली आहे. त्याची पडताळणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याचे काम लवकर पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...