सोलापूर जिल्हा बॅंक पुढील वर्षी रुळावर

सोलापूर जिल्हा बॅंक पुढील वर्षी रुळावर
सोलापूर जिल्हा बॅंक पुढील वर्षी रुळावर

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर प्रशासक आले आहेत, तेव्हापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम सुरू केले. त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर बॅंकेच्या खातेदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. बॅंकेकडे असलेल्या मोठ्या खातेदारांची थकबाकी वसूल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. १ एप्रिल २०२० पासून पात्र शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने कर्ज देण्यास सुरवात करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी नुकतीच येथे पत्रकार परिषदेत दिली. 

कोतमिरे म्हणाले, ‘‘विजय शुगर आणि आर्यन शुगरकडे ४४५ कोटी रुपयांची येणी बाकी आहेत. या दोन संस्थांकडेच मोठ्या प्रमाणात बॅंकेचे पैसे अडकले आहेत. बॅंकेचा आर्थिक गाडा रुळावर येऊन मार्च २०२० नंतर जिल्हा बॅंक पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. गेल्या सहा महिन्यांपूर्वी बॅंकेच्या प्रगतीसाठी बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन २०१९ अंतर्गत उद्दिष्ट निश्‍चित केले. त्यामध्ये बॅंकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. बॅंक आपल्यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली. त्यातून बॅंकेचे कर्मचारी सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचले.``

 ‘‘ग्रामीण भागात विद्यार्थी मेळावे घेतले. वंचित घटकांना बॅंकिंग व्यवहाराच्या प्रवाहात आणले. जिल्ह्यातील नागरी बॅंका आणि नागरी पतसंस्थांचे व्यवहार जिल्हा बॅंकेशी जोडून घेतले. त्यांचे व्यवहार वाढल्याने बॅंकेला फायदा झाला. जिल्हा बॅंकेत पतसंस्थेच्या २१ कोटींच्या ठेवी आता ७० कोटींवर पोचल्या आहेत. नागरी बॅंकांचे आर्थिक व्यवहारदेखील वाढले अाहेत, असेही कोतमिरे यांनी सांगितले.

‘‘बीडीपी २०१९ अंतर्गत बॅंकेच्या एकूण २०८ शाखांपैकी ८३ शाखांनी त्यांना दिलेले ठेवीचे लक्ष शंभर टक्के पूर्ण केले आहे. ९० ते ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेल्या २४ तर ८० ते ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेल्या शाखांची संख्या ५८ आहे. प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये खातेदारांचा समावेश केला आहे,''असेही ते म्हणाले.

बॅंकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, व्यवस्थापक के. आर. पाटील, सहायक व्यवस्थापक एम. सी. दुलंगे, आर. डी. गोठे, राजू शिंदे, मंजिरी अंत्रोळीकर आदी उपस्थित होते.

भागभांडवलात पावणेपाच कोटीची वाढ

२०१८-१९ या वर्षासाठी पीककर्ज वितरणासाठी शासनाने बॅंकेला ८०६ कोटी ३२ लाखाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापोटी बॅंकेने मार्च २०१९ अखेर १२६० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ४१७ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटले आहे. मार्च २०१९ अखेर भागभांडवलमध्ये चार कोटी ७५ लाखांनी वाढ झाली आहे. आता २७५० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, अशी माहिती शैलेश कोतमिरे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com