सोलापूर जिल्हा सहकारी बॅंक ‘मायक्रो फायनान्स’मध्ये उतरणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आता हळूहळू उभारी घेत असून, बिगरशेती कर्जदारांकडील वसुली बऱ्यापैकी वसूल झाल्यानंतर आता जिल्हा बॅंक मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोचणार आहे. पगारदारांना गृहकर्ज, वाहनकर्ज, जॉइंट लायबिलिटी ग्रुपच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांपर्यंत आता बॅंक पोचणार आहे. त्यासाठी बॅंकेने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. पहिल्यात टप्प्यात उत्तर सोलापूर, बार्शी, माढा आणि पंढरपूर तालुक्‍यांत हा कर्जपुरवठा केला जाणार आहे.

बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे हे त्यासाठी पुढाकार घेत आहेत. २०२० या माध्यमातून बॅंकेने बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनला आता आठ कलमी कार्यक्रमांची जोड मिळणार आहे. मार्च २०२० अखेर बॅंकेचा ताळेबंद पारदर्शक व सक्षम करण्यासाठी कार्यवाही करणे, मार्च २०१८ अखेर बॅंकेचा एनपीए ३९ टक्के आहे. या एनपीएत घट करून मार्च २०२० अखेर हा एनपीए १० टक्‍क्‍यांपर्यंत आणण्यासाठी कार्यवाही करणे, बॅंकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुरक्षित कर्जवाटप करून ‘ब्रॅन्च ॲस बॅंक’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यालाच आता मायक्रो फायनान्सचीही जोड देण्यात येणार आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन हजार ५०० संयुक्त देयता समूहाला किमान २५ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला जाणार आहे. या माध्यमातून ५० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले जाणार आहे. 

शेतकऱ्यांनाही मिळणार कर्ज ग्राहक सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, लोकाभिमुख सेवा, कर्ज योजना, तत्पर व उत्कृष्ट सेवा देण्याबाबत बॅंकेचे प्रयत्न सुरू आहेत. बॅंकेच्या वसुलीअभावी शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी आहेत. पण, आता त्यासंबंधीचे नियोजन सुरू आहे. अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचे शेती कर्जवाटप करण्याबाबतही बॅंकेकडून तयारी करण्यात येत आहे. २०१९-२० च्या खरिपात शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे कर्जवाटप करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com