Agriculture news in marathi Solapur District Bank will provide short term crop loan | Agrowon

सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने एक ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने एक ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून ज्या शेतकरी सभासदांनी अल्पमुदत पीक कर्जाची बाकी पूर्णता भरली आहे. त्या सभासदांना पुनश्‍च पीक कर्ज वाटप करण्याचे धोरण बॅंकेने स्वीकारले आहे. त्यानुसार एक ऑक्‍टोबरपासून हे पीक कर्जवाटप करण्यात येणार आहे.

पीक कर्ज वाटपाच्या नवीन धोरणातंर्गत ज्या प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची ३० जून २०२० अखेर बॅंक पातळीवरील कर्जाची वसुली शंभर टक्के व संस्था पातळीवरील सभासद कर्जाची वसुली ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. अशा संस्था पात्र ठरविण्यात आल्या आहेत. इष्ट तफावतीमध्ये व नफ्यामध्ये असलेल्या सोसायट्यांच्या सभासदांना अल्पमुदत पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. 

नवीन धोरणानुसार जिरायती पिकासाठी अल्पमुदत कमाल कर्ज मर्यादा २५ हजार रुपये, संपूर्ण बागायती क्षेत्रासाठी अल्पमुदत कमाल कर्जाची मर्यादा एक लाख रुपये, जिरायत व बागायत पीक कर्जासाठी एकत्रित कमाल कर्ज मर्यादा एक लाख रुपये इतकी असणार आहे.

ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने वसूल  करतात अशा संस्थेमार्फत प्रायोगिक तत्त्वावर अल्प मुदतीचे कर्ज वाटपाचे धोरण राबविले जाणार आहे. 

जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एक हजार २६४ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. त्यापैकी नवीन धोरणानुसार पीक कर्ज वाटपास ३३४ संस्था पात्र आहेत. उर्वरित संस्थानी बॅंक पातळीवर १०० टक्के वसुली व संस्था पातळीवर ५० टक्के वसुली केल्यास त्याही संस्था नवीन धोरणानुसार पीक कर्ज वाटपास पात्र होणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...