Agriculture news in marathi In Solapur district, crop loan disbursement is only 15 percent | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात पीक कर्जवाटप अवघ्या १५ टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जून 2020

उसासाठी कर्ज हवे आहे. कागदपत्रे गोळा करण्यातच वेळ चालला आहे. पूर्वीचे कर्ज असूनही पुन्हा नव्याने कागदपत्रे मागत आहेत. पुनर्गटनाच्या कर्जाबाबत अद्याप आदेश नाही, असे सांगतात. 
- अमर इंगळे, शेतकरी, उंबरेपागे, ता. पंढरपूर,जि. सोलापूर 

पीककर्जवाटपावर लक्ष ठेवून आहोत. सातत्याने त्याचा आढावा घेत आहोत. काही बँकांमध्ये शेतकऱ्यांकडूनच प्रतिसाद नाही. अडचण असेल, तर शेतकऱ्यांनी बँकांशी, आमच्याशी संपर्क साधावा. प्रतिसाद पाहून ऑनलाईन फॅार्म भरून घेणार आहोत. तसेच गावोगाव शिबिरे भरवण्याचा विचार आहे. 
- संतोष सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक, सोलापूर 

सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक कर्जवाटपासाठी अग्रणी बँकेने १४३८ कोटी ५२ लाख रुपयांचा पतआराखडा तयार केला आहे. पण, त्यापैकी आतापर्यंत फक्त २२१ कोटी ५३ लाख ३७ हजार (१५.४० टक्के) रुपये एवढेच वाटप झाले आहे. बँकांकडून सांगितली जाणारी कागदपत्रांची जंत्री आणि विविध कारणांचा पाढा, ही कर्जवाटप रखडण्याची प्रमुख कारणे आहेत. 

दरवर्षी जिल्ह्याचा पतआराखडा आखला जातो. जिल्हाधिकारी स्वतः त्यावर नियंत्रण करतात. पण, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तिकडेच अधिक व्यस्त आहेत. त्यामुळे पीककर्जाच्या विषयाकडे त्यांनी अद्याप लक्ष दिले नसल्याचे दिसते. परिणामी, बँका अधिक बेफिकीरीने वागत असल्याचे चित्र आहे. 

नव्या कर्ज वाटपाबाबत बँका अगदीच उदासीन असल्याचे दिसते. सात-बारा उतारा, आठ अ, पीकनोंदणी दाखला, ग्रामसेवक, तलाठ्यांचा येणेबाकी नसल्याचा दाखला, यासारखी ढिगभर कागदपत्रे सांगितली जात आहेत. पुन्हा ती मिळवण्यासाठी तलाठी, ग्रामसेवकाच्या पाठीमागे लागावे लागते. तेही जागेवर भेटत नाहीत, या हेलपाट्यानेच शेतकरी हैराण होऊन पुन्हा बँकांकडे जाण्याचे टाळत आहेत. 

कर्जमाफीधारक शेतकरी वाऱ्यावर 

जुन्या कर्जदारांनाही काही बँका नव्याने पुन्हा सर्व कागदपत्रे मागत आहेत. तसेच कर्जमाफी झालेल्या आणि पुनर्गठण झालेल्या शेतकऱ्यांनाही बँका वरुन अद्याप आदेश आले नाहीत, असे सांगत आहेत. अशा प्रकारे विविध कारणांचा पाढा वाचला जात आहे. त्यातही राष्ट्रीयकृत बँका आघाडीवर असून, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज न देता बॅंकांनी वाऱ्यावर सोडले आहे. 

असा आराखडा, असे वाटप 

  • २९ बँकांच्या ५३५ शाखांद्वारे कर्जवाटप 
  • खरिपासाठी १४३८ कोटी ५२ लाख रुपयांचा आराखडा 
  • १०५९ कोटी ६९ लाख रुपये राष्ट्रीयकृत बँकांचे उद्दिष्ट 
  • जिल्हा बँकेला १५४ कोटी ५७ लाखांचे उद्दिष्ट 
  • आतापर्यंत फक्त २२१ कोटी ५३ लाखांचे वाटप 

बँकांची प्रमुख कारणे 

  • पुनर्गठण आणि कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना नव्याने कर्ज देण्याबाबत परिपत्रक नाही. 
  • एकत्र कुटुंब असेल आणि खाती अनेक असतील, तर तुमचे खाते निरंक नाही, कर्ज देण्यात अडचण आहे. 
  • जुन्या कर्जदारांनी नव्या कर्जासाठी पुन्हा नव्याने सर्व कागदपत्रे द्यावीत. 

 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...