सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल मंडळांत अतिवृष्टी

सोलापूर: जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १४ जणांचा आतापर्यंत अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पंढरपुरातील सात, बार्शीतील दोन, दक्षिण सोलापूरमधील एक, माढ्यातील चार जणांचा समावेश आहे.
 in Solapur district Excessive rainfall in 75 revenue boards
in Solapur district Excessive rainfall in 75 revenue boards

सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १४ जणांचा आतापर्यंत अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पंढरपुरातील सात, बार्शीतील दोन, दक्षिण सोलापूरमधील एक, माढ्यातील चार जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ५६५ गावांना महापूराचा फटका बसला आहे. ९१ महसूल मंडळांपैकी तब्बल ७५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. या महसूल मंडळात एका दिवसांत ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, बोरी, भोगावती, नागझरी या नद्यांसह मोठे ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. महापूरामुळे जिल्ह्यातील ४ हजार ८९५ घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.

महापुरामुळे ४ हजार ८३५ कुटुंबांतील १७ हजार जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नदी, नाले व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे जवळपास १७९ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

 महापुरात  ३६५ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १ हजार ७१६ घरांची पडझड झाली आहे. महापुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग व एनडीआरएफ यांच्यावतीने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. 

पूरग्रस्तांची विविध ठिकाणी व्यवस्था

महापुराचा धोका असलेल्या गावांमधील जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, साखर कारखाना, समाज मंदिरे अथवा बाधितांच्या नातेवाइकांच्या घरी, मठांमध्ये पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com