सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू लागली

सोलापूर ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात मूगाची दरवर्षीच्या तुलनेत दुप्पट पेरणी झाली. परंतु बऱ्याच भागात मुगाची पाने पिवळी पडत आहेत.
In Solapur district, the green leaves started turning yellow
In Solapur district, the green leaves started turning yellow

सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात मूगाची दरवर्षीच्या तुलनेत दुप्पट पेरणी झाली. परंतु बऱ्याच भागात मुगाची पाने पिवळी पडत आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पेरा होऊनही निराशा पदरी पडण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात खरिपात तूर, सोयाबीन, उडदाबरोबर मूगाचीही चांगली पेरणी होते. पण, मूगाचे सगळे गणित पावसावर अवलंबून असते. त्यामुळे तेवढी पेरणी होत नाही. यंदा मात्र कधी नव्हे, तो पाऊस वेळेवर झाला. साहजिकच, पेरणीक्षेत्र वाढले.

जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा, मंगळवेढा, बार्शी, दक्षिण सोलापूरात मूगाची क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदा मूगासाठी कृषी विभागाने १३ हजार ६५० सरासरी क्षेत्र निश्चित केले होते. पण, तब्बल पेरणी २४ हजार ४३३ हेक्टरवर पोचली आहे. जवळपास सरासरीच्या दुपटीने क्षेत्रात वाढ झाली आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांत अधून-मधून पडणारा पाऊस आणि वातावरणातील सातत्याच्या बदलामुळे मूगाची पाने पिवळी पडू लागली आहेत. सध्या अनेक भागात मूग सेटिंग अवस्थेत आहे. परंतु, पाने पिवळी पडत असल्याने शेंगा लागण्याचे प्रमाण  कमी झाले आहे. करमाळा, अक्कलकोट, बार्शी भागात सर्वाधिक ही समस्या जाणवत आहे. 

अक्कलकोटमध्ये तज्ज्ञांकडून पाहणी

सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या विषय तज्ज्ञांनी नुकतीच अक्कलकोट भागात काही शेतकऱ्यांच्या शेतावर पाहणी केली. तसेच त्यावर काही उपायही सुचवले आहेत. पण, मुगाची पाने पिवळी पडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उत्पादन आणि उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com