Agriculture news in marathi In Solapur district, the incidence of 'Humani' increased on sugarcane | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव वाढला

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. तोच आता उसावरही हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर विविध रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. तोच आता उसावरही हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  

यंदा वेळेवर पाऊस पडल्याने कधी नव्हे, ते खरिपात तूर, सोयाबीन, मूग, उडादाचा पेरा चांगला वाढला आहे. पण, ही पिके सध्या विविध किड-रोगांच्या समस्येमुळे अडचणीत आली आहेत. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचा भरवसा उसावर होता. पण, आता त्यावरही हुमणीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची धावाधाव  सुरु आहे. 

जिल्ह्यातील करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मोहोळ आणि मंगळवेढ्यातील काही भागात हा रोग प्रामुख्याने आढळून आला आहे. त्याचे क्षेत्र कितपत विस्तारेल, हे सध्या तरी सांगता येत नसले, तरी वातावरणातील बदल त्याला आणखीनच पोषक ठरत आहे. त्यामुळे त्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. वास्तविक, गेल्या दोन-तीन वर्षांपासून उसावर कीड-रोगांचा फारसा प्रादुर्भाव नव्हता. पण, यंदा तो आढळून येत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यात भर पडली आहे.

ऊस दर नाही, बिलेही थकली

एकीकडे उसाला दर नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून एफआरपीची बिले थकली आहेत. त्यासाठी वणवण सुरु असताना, आता किडरोगावर खर्च करुन पुन्हा जादा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. 

उसात हुमणीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. वेळीच नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण, अद्याप तरी आटोक्यात नाही.  कृषि विभागाने यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे. अन्यथा, मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.  
- प्रवीण नवले, ऊस उत्पादक शेतकरी, केतूर, ता. करमाळा


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...