सोलापूर जिल्हा भूमि अभिलेखने मिळवला ३० लाखांचा महसूल

आम्ही योग्य ती काळजी घेऊन काम केले. त्यामुळे अवघ्या महिन्याभरातच हा महसूल जमा झाला आहे. शासनाच्या कोरोनासंदर्भातील सूचनांनुसार कामकाज सुरू आहे. - हेमंत सानप, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी.
Solapur district land records earned revenue of Rs 30 lakh
Solapur district land records earned revenue of Rs 30 lakh

सोलापूर  : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व अधीनस्त कार्यालयांमार्फत नागरिकांना जून महिन्यात विविध प्रकारच्या मागणी अर्जानुसार ३ हजार ४१६ कागदपत्रांच्या प्रमाणीत नकला, मिळकतपत्रिका वितरीत करण्यात आल्या आहेत. या नकला, कागदपत्रे वितरीत करण्यापोटी व मोजणी शुल्कापोटी नागरिकांकडून ३० लाख १५ हजार ८९३ रुपयांचा महसुल जमा झाला आहे.

नागरिकांना जमिनीच्या व घरजागेच्या संबंधी विविध कागदपत्रे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आणि त्यांच्या अखत्यारीतील ११ तालुक्‍यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख आणि नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयाकडून वितरीत होतात. या कार्यालयांकडे घरजागांच्या हस्तांतरण फेरफाराच्या आणि वारसांच्या नोंदी होतात. 

लॉकडाऊनच्या कालावधीत कर्मचारी कमी असल्यामुळे या कामात थोडीशी शिथीलता आली होती. मात्र, जून महिन्यात नागरिकांना आवश्‍यक असणारी सर्व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. हे काम करत असताना प्रत्येक कार्यालयात कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी केली जावी, याबाबतही कळविण्यात आले होते. 

सर्व तालुक्‍यातील उप अधीक्षक कार्यालय आणि शहरातील नगर भूमापन कार्यालयात कामकाज सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाकडून मोजणी विषयक कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे.

मोजणीपोटी जूनमध्ये २९ लाख १५ हजार २५० रुपये महसुल जमा झाला. कागदपत्राच्या नक्कल शुल्का पोटी ८९ हजार २२१ रुपये, तर नकाशा शुल्क,  विक्री पोटी ११ हजार ४२२ रुपये, असे एकूण ३० लाख १५ हजार ८९३ रुपायांचा महसुल शासन दरबारी जमा झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com