सोलापूर दूध संघ निवडणूक : मतदार यादीत फक्त ६२ संस्था

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. दूध संघाशी संलग्नित असलेल्या संस्थांनी प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबतचा ठराव ३ फेब्रुवारीपर्यंत पाठविणे आवश्‍यक आहे. - ए. ए. गावडे, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध)
Solapur district milk union only 62 milk organizations in the voter list for election
Solapur district milk union only 62 milk organizations in the voter list for election

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी तालुका सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत फक्त ६२ संस्थांचा समावेश असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील माळशिरस वगळता ११ पैकी १० तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या दूध संघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप यादीत फक्त ६२ संस्थांचा समावेश झाला आहे. 

दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्‍ंयातील प्रत्येकी एक संस्था, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील दोन, मोहोळमधील चार, माढ्यातील तीन, पंढरपुरातील सहा, सांगोल्यातील चार, मंगळवेढ्यातील १५, बार्शीतील १२ आणि करमाळ्यातील १४ अशा ६२ संस्थांचा समावेश प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीत झाला आहे. 

सध्या २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडण्याकरिता निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेसचे वर्चस्व सध्या दूध संघावर आहे.  दूध संघाचे १७ संचालक असून, सर्वसाधारण मतदारसंघातून १२, ओबीसी मतदारसंघातून एक, महिला मतदारसंघातून दोन, अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघातून एक आणि भटक्‍या जाती व जमातींतून एक संचालक निवडण्यात येणार आहे. 

खासगी दूध संघांचा शिरकाव

जिल्ह्यात दररोज साडेबारा लाख लिटर दुधाचे संकलन होते. सोलापूरच्या दूध व्यवसायात खासगी दूध संघांचा मोठा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेक सहकारी दूध संस्था सोलापूर जिल्हा दूध संघासोबत संलग्न आहेत. परंतु, दूध मात्र खासगी दूध संघाला घालत आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेमध्ये सोलापूर जिल्हा दूध संघाची प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्‍यता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com