सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द करा'ची मागणी फेटाळली

दूध संघाला दिलेली नोटीस योग्य आहे. सध्या सुरू असलेली कारवाई योग्य आहे. नोटिशीमध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांवर ५ मार्चपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याची सूचना करण्यात आली आहे. - सुनील शिरापूरकर, विभागीय उपनिबंधक, दुग्धविकास विभाग.
Solapur district milk union's demand for 'cancellation notice' rejected
Solapur district milk union's demand for 'cancellation notice' rejected

सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या (दूध पंढरी) आर्थिक कारभाराबाबत दुग्ध विकास विभागाचे पुणे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दूध संघाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु ही नोटीस रद्द करावी, अशी मागणी दूध संघातर्फे सुनावणीत करण्यात आली. पण, ही मागणी शिरापूरकर यांनी फेटाळून लावली. दरम्यान, आता ५ मार्चपर्यंत दूध संघ व संचालकांनी लेखी म्हणणे मांडावे, अशी सूचना शिरापूरकर यांनी केली. 

जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून संघावर प्रशासक नियुक्त का करू नये? याबाबतच्या नोटिशीवर शिरापूरकर यांच्यासमोर सुनावणी झाली. ॲड. अजिंक्‍य मराठे, संघाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे उपस्थित होते. 

दूध संघावर कारवाई करण्यासाठी दूध संघाला शासनाची वित्तीय मदत झालेली नाही. महानंदाचा अभिप्राय आल्यानंतर तुम्ही कारवाई करा, नोटिशीमधील मुद्दे गंभीर नसल्याने कारवाई करू नये, यासाठी इतर मुद्दे घालून दूध संघातर्फे  उपनिबंधक शिरापूरकर यांच्याकडे अर्ज करण्यात आला होता. या मुद्यांवर दीर्घकाळ चर्चा झाली. पण, संघाची मागणी त्यांनी फेटाळून लावली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com