सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४ कोटींची गरज

सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४ कोटींची गरज
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४ कोटींची गरज

सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख ३७ हजार ७०१ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी २०४ कोटी नऊ लाख रुपयांची आवश्‍यकता आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. 

जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ७३९ हेक्‍टर क्षेत्राचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये फळपिकाखालील बाधित क्षेत्र २२ हजार १८४ हेक्‍टर, बागायती पिकाखालील क्षेत्र ६८ हजार ८६८ हेक्‍टर, तर जिरायत पिकाखालील क्षेत्र एक लाख चार हजार ६८६ हेक्‍टर इतके आहे. 

बार्शीत सर्वाधिक नुकसान 

ऑक्‍टोबर महिन्यातील अतिवृष्टीने बार्शी तालुक्‍यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्‍यातील ५२ हजार ९६२ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्‍यात सर्वांत कमी म्हणजे एक हजार ९५६ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा संयुक्त अहवाल गुरुवारी (ता. १४) शासनाला पाठविला आहे.

तालुकानिहाय नुकसान स्थिती (हेक्‍टर)

तालुका  नुकसान (हेक्टरमध्ये) नुकसानीची रक्कम
उत्तर सोलापूर  १३ हजार ४५२   १४ कोटी १५ लाख
बार्शी ५२ हजार ९६२ ४४ कोटी ७४ लाख
दक्षिण सोलापूर  १७ हजार ६३४ १४ कोटी ५६ लाख
अक्कलकोट २७ हजार ७७४  २४ कोटी ३३ लाख
माढा  १० हजार ३५१  १३ कोटी सात लाख
करमाळा १७ हजार ७३६ १८ कोटी दोन लाख
पंढरपूर   १५ हजार ५९१   २३ कोटी ७८ लाख
मोहोळ १९ हजार पाच २८ कोटी ३३ लाख
मंगळवेढा ११ हजार २७५ ११ कोटी ४० लाख
सांगोला  एक हजार ९५६  तीन कोटी ३० लाख
माळशिरस सात हजार एक आठ कोटी ३५ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com