सोलापूर जिल्ह्यात एक लाख ६३ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

सोलापूर ः राज्य शासनानाकडून पीक भरण्याची मुदत १५ जुलैवरून २३ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. पण आतापर्यंत एक लाख ६३ हजार ६८० शेतकऱ्यांनी एक लाख २८ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांसाठी विमा भरला आहे.
In Solapur district, one lakh 63 thousand farmers paid crop insurance
In Solapur district, one lakh 63 thousand farmers paid crop insurance

सोलापूर ः राज्य शासनानाकडून पीक भरण्याची मुदत १५ जुलैवरून २३ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. पण आतापर्यंत एक लाख ६३ हजार ६८० शेतकऱ्यांनी एक लाख २८ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांसाठी विमा भरला आहे. यापोटी शेतकऱ्यांनी ७.५५ कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. ही संख्या आणखी वाढू शकते, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या महिन्यात सुरवातीला पाऊस झाला. पण नंतर पावसाने काही दिवस हुलकावणी दिली. या महिन्यात पुन्हा पावसाने सुरवात केली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस होतो आहे. पण त्यात जोर नाही. पावसाच्या या लहरीपणामुळेच पेरण्या रखडत गेल्या. साहजिकच, त्याचा परिणाम पेरणीवर आणि पुढे पीक विमा भरण्यावर झाला. पण आता जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीला वेग आला.

आतापर्यंत जिल्ह्यात ९२ टक्क्यांच्या पुढे पेरणी पोचली आहे. त्यामुळे विमा उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढेल, असे सांगण्यात आले.

तालुकानिहाय विमाधारक शेतकरी आणि क्षेत्र

अक्कलकोट : २५ हजार ६३० शेतकऱ्यांनी १९५०३ हेक्टर, बार्शी ः ८९ हजार १८४ शेतकऱ्यांनी ७१ हजार १३ हेक्टर, करमाळा : ५६४१ शेतकऱ्यांनी ३५७९ हेक्टर, माढा : ७१४१ शेतकऱ्यांनी ५२१३ हेक्टर, माळशिरस : २४९ शेतकऱ्यांनी १४२ हेक्टरवरील, मंगळवेढा ः २२ हजार २६४ शेतकऱ्यांनी १६ हजार ९३९ हेक्टर, मोहोळ : ३११४ शेतकऱ्यांनी २८८६ हेक्टर, पंढरपूर : १६३ शेतकऱ्यांनी १०५ हेक्टर, सांगोला : १७९९ शेतकऱ्यांनी १२४९ हेक्टर, उत्तर सोलापूर : ४३१९ शेतकऱ्यांनी ४३८० हेक्टर, दक्षिण सोलापूर : ४१७६ शेतकऱ्यांनी ३५२२ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com