सोलापूर जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी ६७ हजारांवर शेतकरी

प्रत्येक गावात या याद्या लावल्या आहेत. शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव खात्री करुन तातडीने आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, त्यामुळे पुढील प्रक्रिया सोपी होईल. - कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था), सोलापूर
In Solapur district, over the 67 thousand farmers in second list for debt relief
In Solapur district, over the 67 thousand farmers in second list for debt relief

सोलापूर : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत जिल्ह्यात ७९ हजार ४६७ शेतकऱ्यांपैकी ६७ हजार ८१० शेतकऱ्यांची यादी पात्र करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचीही यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापैकी ११ हजार ८०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्य शासनाने २८ फेब्रुवारीला कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यातील ६७ हजार ८१० शेतकऱ्यांचा समावेश आहे. या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी जवळील महा ई सेवा केंद्र वा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण करावे, यादीत नाव आहे का ? याची तपासणी करावी. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित बँक, सेवा सोसायटी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याचे भोळे यांनी सांगितले.

दरम्यान, दुसऱ्या यादीत बऱ्यापैकी शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे आता कर्जमाफीची प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण होणार आहे

कर्जमुक्तीसाठी तालुकावार पात्र शेतकरी 

दक्षिण सोलापूर  २९६३
उत्तर सोलापूर  २०२१
अक्कलकोट  ५२३३ 
मंगळवेढा ३७६३
सांगोला  ३२२६ 
माळशिरस  ९७३६
करमाळा ५६८९ 
पंढरपूर  १३४३६ 
माढा ९३५५ 
मोहोळ ५७०६
बार्शी ६६८२
एकूण ६७ हजार ८१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com