सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५ कोटींची वाढ

पुणे विभागात पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा आराखडा आहे. दिलेल्या वाढीव निधीतून कोणत्या विभागाला निधीची तरतूद करायची, याबाबतचा योग्य निर्णय घ्यावा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखड्यातील कामे गतीने होण्यासाठी लक्ष घालावे. - अजित पवार, अर्थमंत्री.
Solapur District Plan increased by Rs 74.45 crore
Solapur District Plan increased by Rs 74.45 crore

सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.७५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. या वाढीसह जिल्ह्याच्या ४२४.३२ कोटी रुपयांच्या आराखड्यास पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, यशवंत माने, रामहरी रूपनवर, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते. 

सोलापूर जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्याच्या ३४९.८७ कोटी रुपयांच्या आराखड्यास नुकतीच मंजुरी दिली होती. कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी लक्षात घेता, राज्यस्तरीय बैठकीत ११६ कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार बैठकीत अधिकाची मागणी करण्यात आली. मात्र, वित्तीय मर्यादा लक्षात घेता ७४.४५ कोटी रुपयांच्या अधिकचा निधी देण्याचे अर्थमंत्री पवार यांनी सांगितले. मात्र, अर्थसंकल्पी नियोजनाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्याला आणखी निधी मिळावा, अशी अपेक्षा वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जलसंपदा विभागांचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता शेखर साळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, सहायक नियोजन अधिकारी दिलीप पवार, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले आदी उपस्थित होते.

उजनी पाइपलाइनबाबत बैठक

उजनी धरणातून सोलापूर शहराला थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे. अडचणी दूर करण्यासाठी पालकमंत्री, जलसंपदामंत्री, पाणीपुरवठामंत्री यांची व्यापक बैठक बोलवण्यात येईल, असेही पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com