Agriculture news in Marathi, Solapur district receives the first heavy rainfall | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच सर्वदूर जोर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी (ता. २१) मध्यरात्री पुन्हा जोरदार हजेरी लावली. बहुतांश सर्व भागात हा पाऊस पडल्याने आणि यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक जोरदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाची थांबून-थांबून रिपरिप सुरूच होती. त्यानंतरही दिवसभर कधी ऊन आणि कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती होती. जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, बार्शी, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर भागात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला. 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी (ता. २१) मध्यरात्री पुन्हा जोरदार हजेरी लावली. बहुतांश सर्व भागात हा पाऊस पडल्याने आणि यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक जोरदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाची थांबून-थांबून रिपरिप सुरूच होती. त्यानंतरही दिवसभर कधी ऊन आणि कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती होती. जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, बार्शी, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर भागात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला. 

 दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. यंदा पावसाने पहिल्यापासूनच जेमतेम हजेरी लावली. पावसाचा हंगामही उलटून गेला, आता मात्र पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री पावसाने चांगली हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री पुन्हा पावसाने जोर लावला. यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वाधिक जोर असणारा पाऊस म्हटला जातो. 

विशेषतः अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि मोहोळच्या काही भागात पाऊसच नव्हता; पण या पावसाने या भागातील लोकांना त्यामुळे दिलासा मिळाला. उत्तर सोलापुरातील नान्नज, वडाळा, मार्डी, कारंबा भागात पहाटे दोनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सुमारे तासभर थांबून-थांबून त्याची रिपरिप सुरू होती. करमाळा व परिसरात तीन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. सोमवारी पुन्हा या पावसाने हजेरी लावली. तालुक्‍यातील ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. तलावात पाणीसाठा होण्यास सुरवात झाली आहे. 

तालुक्‍यातील कोर्टी, राजुरी, सावडी, कुंभारगाव भागात अद्याप पाऊस झाला नव्हता, या पावसाने दिलासा दिला आहे. बार्शी तालुक्‍यात गेल्या तीन दिवसांपासून चित्रा नक्षत्राने दमदार हजेरी लावली. या पावसाने तालुक्‍याला अक्षरशः झोडपून काढले. सकाळी उन्ह आणि दुपारी पाऊस अशी स्थिती गेल्या दोन-तीन दिवसांपासून आहे. बार्शी,  वैराग, आगळगाव, उपळेदुमाला, गौडगाव,  पांगरी, पानगाव, नारी, सुर्डी, खांडवी आदी भागात पावसाचा जोर होता. पंढरपुरातही तुंगत, देगाव, अजनसोंड, सुस्ते भागात पावसाने हजेरी लावली.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...