नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार १५३ कोटी
सोलापूर : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात नदीकाठच्या गावातील उद्ध्वस्त झालेली पिके आणि ऑक्टोबरमधील अतिवृष्टीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान, यासाठी १५३ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १५३ कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सोलापूर : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात नदीकाठच्या गावातील उद्ध्वस्त झालेली पिके आणि ऑक्टोबरमधील अतिवृष्टीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान, यासाठी १५३ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १५३ कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत उद्भवलेल्या पूरस्थितीत नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नदीकाठच्या पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. त्यानुसार, बॅंकांच्या वतीने सहकार आयुक्तांना कर्जमाफीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणाऱ्या प्रचलित दराच्या तिप्पट भरपाई (एक हेक्टरच्या मर्यादेत) देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या भरपाईपोटी जिल्ह्याला २६ कोटी ३० लाख १५ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. कोरडवाहू पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रचलित दरानुसार हेक्टरी सहा हजार ८०० रुपये भरपाई मिळते. या वेळी शेतकऱ्यांना २० हजार ४०० रुपये मिळणार आहेत. आश्वासित सिंचनाखाली पिकांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ५०० रुपये मिळतात. या वेळी ४० हजार ५०० रुपये मिळणार आहेत. बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये मिळतात. या वेळी शेतकऱ्यांना ५४ हजार रुपये मिळणार आहेत.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने १७४ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार, शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातही रक्कम मिळाली आहे.
वाटपाबाबत ढिलाई
या आधी कोरडवाहू दुष्काळाची तसेच नंतर ओल्या दुष्काळाची पहिल्या टप्प्यातील मदत अद्यापही अनेक भागातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्याकडे त्याच्या याद्याही तयार आहेत. पण बॅंक अकाउंट आणि आयएफसी कोडमधील बदलांमुळे काही त्रुटी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाटप प्रलंबित आहे. पण त्याबाबत गांभीर्याने काम होत नाही. हीच कारणे सातत्याने दिली जात आहेत. केवळ ढिलाईचे काम तलाठी आणि मंडलाधिकारी करत असल्याचे चित्र आहे.
- 1 of 1024
- ››