Agriculture news in marathi Solapur district will receive Rs 153 crore for crop loss | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार १५३ कोटी

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 डिसेंबर 2019

सोलापूर  : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात नदीकाठच्या गावातील उद्‌ध्वस्त झालेली पिके आणि ऑक्‍टोबरमधील अतिवृष्टीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान, यासाठी  १५३ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १५३ कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

सोलापूर  : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात नदीकाठच्या गावातील उद्‌ध्वस्त झालेली पिके आणि ऑक्‍टोबरमधील अतिवृष्टीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान, यासाठी  १५३ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १५३ कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

जुलै ते ऑक्‍टोबर या कालावधीत उद्‌भवलेल्या पूरस्थितीत नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नदीकाठच्या पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. त्यानुसार, बॅंकांच्या वतीने सहकार आयुक्तांना कर्जमाफीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणाऱ्या प्रचलित दराच्या तिप्पट भरपाई (एक हेक्‍टरच्या मर्यादेत) देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

या भरपाईपोटी जिल्ह्याला २६ कोटी ३० लाख १५ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. कोरडवाहू पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रचलित दरानुसार हेक्‍टरी सहा हजार ८०० रुपये भरपाई मिळते. या वेळी शेतकऱ्यांना २० हजार ४०० रुपये मिळणार आहेत. आश्‍वासित सिंचनाखाली पिकांसाठी शेतकऱ्यांना हेक्‍टरी १३ हजार ५०० रुपये मिळतात. या वेळी ४० हजार ५०० रुपये मिळणार आहेत. बहुवार्षिक पिकांसाठी हेक्‍टरी १८ हजार रुपये मिळतात. या वेळी शेतकऱ्यांना ५४ हजार रुपये मिळणार आहेत. 

ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने १७४ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार, शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातही रक्कम मिळाली आहे.

वाटपाबाबत ढिलाई

या आधी कोरडवाहू दुष्काळाची तसेच नंतर ओल्या दुष्काळाची पहिल्या टप्प्यातील मदत अद्यापही अनेक भागातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्याकडे त्याच्या याद्याही तयार आहेत. पण बॅंक अकाउंट आणि आयएफसी कोडमधील बदलांमुळे काही त्रुटी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाटप प्रलंबित आहे. पण त्याबाबत गांभीर्याने काम होत नाही. हीच कारणे सातत्याने दिली जात आहेत. केवळ ढिलाईचे काम तलाठी आणि मंडलाधिकारी करत असल्याचे चित्र आहे.


इतर बातम्या
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत केंद्रांवरील...औरंगाबाद : बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची...
ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह...नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान...
रत्नागिरी दूध संघाकडून १ कोटी २० लाख...रत्नागिरी : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील चाळीस...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...
सांगली, कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज : डॉ...सांगली : ‘‘महापूराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे...
वीज दरवाढीबाबत चार फेब्रुवारीला हरकती...मसूर, जि. सातारा ः महावितरणचा २०.४ टक्के वीज...
उत्पादकतेबरोबर विक्री कौशल्यही आवश्‍यक...सोलापूर : "उत्पादकतेबाबत शेतकरी बऱ्यापैकी सजग...
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही...मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या...
कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न...अकोला  ः नवी दिल्ली येथील अखिल भारतीय कृषी...
अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन...नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व...
मोहोळ येथे शेतकऱ्यांनी बॅंक...मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍...
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
बॅंकांनी रोखली गटशेतीची वाट :...नागपूर  ः गटशेती योजनेचे अनुदान ६०...
हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार...परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन...
ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी...मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत...